Take a fresh look at your lifestyle.

संतापजनक : जन्माष्टमीच्या दिवशीच कृष्ण मंदिरांची तोडफोड; भाविकांवर हल्ला, जाणून घ्या कुठे घडली घटना

ऐन कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीच कृष्ण मंदिराची तोडफोड करून, भाविकांवर हल्ला केल्याची अतिशय संतापजनक घटना  घडली आहे.  शेजारी राष्ट्र पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खिप्रोमध्ये, अज्ञातांनी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिराची तोडफोड केली. सोमवारी समाजकंटकांनी कृष्णाच्या मूर्तीची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.  जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी मंदिरातील आयोजित  धार्मिक समारंभा दरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, परिसरात पोलीस कर्मचारी तैनात आहेत. वृत्त लिहीपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पाकिस्तानी पत्रकार आदित्य राज कौल यांनी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्णा मंदिराची तोडफोड करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले. त्याचवेळी, त्यांनी सांगितले की मंदिरात भाविक कृष्णाष्टमीची पूजा करत असताना हा हल्ला करण्यात आला.

पाकिस्तान मध्ये नेहमीच अल्पसंख्याक समुदायावर हल्ले होत असतात 

या घटनेनंतर सोशल मीडियावर  घटनेची अनेक छायाचित्रे शेअर करण्यात आली ज्यात भक्तांवर समाजकंटकांना भाविकांवर हल्ला करताना आपण पाहू शकतो. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हिंदू आणि हिंदू मंदिरांवर हल्ला होण्याची घटना सामान्य आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, शेकडो लोकांनी लाहोरपासून 590 किमी अंतरावर रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात असलेल्या एका हिंदू मंदिराचे नुकसान करण्यात आले .

पाकिस्तानात दरवर्षी 1000 हून अधिक मुली धर्मांतर करतात

मानवाधिकार संघटना मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीस (MSP) च्या मते, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1000 हून अधिक ख्रिश्चन आणि हिंदू महिला किंवा मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यात येते  आणि इस्लामिक रीतिरिवाजांनुसार त्यांचे  लग्न लावण्यात येते. बहुतांश पीडित 12 ते 25 वयोगटातील असल्याचे दिसते .

अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये जवळपास ७५ लक्ष हिंदू राहतात, त्यापैकी बहुतांश सिंध प्रांतात आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अल्पसंख्यांक आणि गैर-इस्लामिक धार्मिक संरचनांवरील  होणाऱ्या हल्ल्यांवर भारताने अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरांवर हल्ले झाले, ज्यात सिंधमधील माता राणी भाटियानी मंदिर, गुरुद्वारा श्री जन्मस्थान, खैबर पख्तूनख्वाच्या कराकमधील हिंदू मंदिर.  पाकिस्तानातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय  हा हिंदू धर्मीय आहे.

Comments are closed.