Take a fresh look at your lifestyle.

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा मानवी हक्कासाठी लढले -राजू द्यावरवार

सेलू (डाॅ विलास मोरे) :- येथील नूतन महाविद्यालयात सोमवारी १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली.

बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी तर मंचावर उपप्राचार्य डॉ महेंद्र शिंदे, पर्यवेक्षक प्रा नागेश कान्हेकर, प्रा दयानंद जामगे उपस्थित होते. पुढे बोलताना द्यावरवार म्हणाले की, जल, जंगल आणि जमीन ही आदिवासीची संपत्ती असते. हेच नष्ट करण्याचा घाट इंग्रजी सत्तेने घातला होता. त्याविरुद्ध आदिवासी बांधवांना लढण्याचे आवाहन बिरसा मुंडा यांनी केले.

त्यांच्या हाकेला ओ देऊन सर्व आदिवासी बंधू भगिनीं एकत्र झाले. त्यांच्या कार्याने प्रभावीत होऊन सगळे त्यांना भगवान म्हणू लागले. आपल्याकडे भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर, भगवान गौतमबुद्ध यानंतर भगवान या पदाला पोहचलेले बिरसा मुंडा आहेत. असे द्यावरवार म्हणाले. आदिवासींचा संघर्ष आजही कायम आहे. फक्त संघर्षाचे स्वरूप बदलले आहे. असेही द्यावरवार म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार डॉ मोहन काटकर यांनी केले.

Comments are closed.