Take a fresh look at your lifestyle.

ना सुई, ना वेदना! लहान मुलांसाठी प्रभावी असलेल्या ‘या’ नवीन कोविड लसीबद्दल जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. देशभरातील सर्व प्रौढ लोकांचे लसीकरण सुरू असल्याने बऱ्याच ठिकाणी लसीचे कमतरता जाणवत आहे. यास जास्त लोकसंख्येच्या तुलनेत कमी लस उत्पादन क्षमता आहे. मात्र, याबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही. देशात आणखी एक लसीच्या मान्यता मिळाली असून लवकरच ही लस नागरिकांना देण्यात येईल.

लहान मुलांनाही देण्यात येईल ही लस

कोरोनाविरोधातील युद्धात भारताला आणखी एक लस मिळाली आहे. ही Zydus Cadila कंपनीची ‘Zaykov-D’ लस आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने या लसीच्या वापरला वापराला हिरवा सिग्नल दिला असून, विशेष गोष्ट म्हणजे ही लस मुलांनाही दिली जाईल. 12 वर्षांवरील वयोगटातील कोणीही ही लस वापरू शकतील. DBT ने दिलेल्या अहवालानुसार, ZyCov-D ही जगातील पहिली DNA- आधारित कोरोनाव्हायरस लस आहे.

जायडस कॅडिला लसीचे तीन डोस देण्यात येणार असून, या लेखात आपण या लसीशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

ही लस कोण घेऊ शकतो?

12 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ही लस वापरू शकते. म्हणजेच मुलांनाही ही लस दिली जाईल. सध्या, फायझर आणि मॉडर्ना या आणखी दोन लसी जगातील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिल्या जात आहेत. यापूर्वी भारतात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लस उपलब्ध होती.

लसीचे किती डोस देण्यात येतील?

सध्या, भारतात लसीचे दोन डोस दिले जात आहेत, परंतु ZyCoV-D लसीचे तीन डोस दिले जातील. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये 28 दिवसांचा अंतर ठेवला जाणार असून, तिसरा डोस 56 व्या दिवशी दिला जाईल.

ही लस डेल्टा स्वरूपाविरुद्ध प्रभावी आहे का?

या लसीची देशभरातील 28 हजार लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे. त्यानुसार ही लस 66.6 टक्के प्रभावी आहे. झायडस कॅडिला कंपनीने दावा केला आहे की ही लस कोरोनाच्या डेल्टा प्रकारावर प्रभावी आहे. डीएनए-आधारित ही लस त्वरीत व्हायरसचे उत्परिवर्तन ओळखते.

ही सुई नसलेली लस आहे का?

झायडस कॅडिलाच्या मते, ही लस कोणत्याही सुईने दिली जात नाही. या प्रक्रियेदरम्यान कोणतीही वेदना होत नाही. ही अनुनासिक लस असण्याची शक्यता आहे.

ही लस कशी ठेवली जाते?

ही लस 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येते.

Comments are closed.