Take a fresh look at your lifestyle.

आज आमदार अनिल भैय्या राठोड यांची प्राकर्षांने आठवण येते : किरण काळे

नगर, : आम्ही आयटी पार्कची इमारत, तेथील काम पहायला गेलो होतो. तेथील लोकांबरोबर आमचे आमची चांगली चर्चा झाली. कोणी गोंधळ केला नाही. कोणीही चुकीचे वागले नाही. मात्र नगर शहरात काॅंग्रेसच्या माध्यमातून सुरु असलेले काम आमदारांना खपत नाही. त्यामुळे मला बदनाम करण्याचे कारस्थान केले जातेय. त्यातूनच हा प्रकार घडला.

दबाबातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलाय असा आरोप काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. शहराला दहशत, गुंडगिरीतून वाचवणारे गोरगरिबांचे नेते माजी आमदार अनिल राठोड यांची प्राकर्षाने आठवण येते असे किरण काळे म्हणाले.

एमआयडीसी भागातील आयटी पार्क इमारतीत जाऊन गोंधळ घातल्याचा तसेच महिलेचा विनयंभग केल्याचा किरण काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.त्या बाबत स्पष्टीकरण देण्यासाठी काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणणे मांडले. काळे म्हणाले, आमच्या आमच्यावर झालेले आरोप हे धादांत खोटे असून ही माझी व माझ्या सहकार्‍यांची अग्निपरीक्षा आहे. या अग्नी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आम्ही निर्भिडपणे तयार आहोत.

कारण की आम्ही स्वच्छ आहोत. मी व माझ्या काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सहकार्याने काल आयटीपार्क ची पाहणी करत असताना कोणत्याही महिलेचा विनयभंग, सदर महिलांना शिवीगाळ, धक्काबुक्की, दमदाटी असे कृत्य केलेले नाही. आयटी पार्कच्या नावाखाली त्या ठिकाणी कॉल सेंटर चालवले जात आहे. सदर कॉल सेंटरमध्ये आम्ही जबरदस्तीने प्रवेश केलेला नाही. सदर प्रवेश हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हरकत नसल्यामुळेच झालेला आहे.

जर तशी त्यांना हरकत असती तर त्यांनी तशा पद्धतीने आम्हाला सुचना केल्या असत्या आणि आम्ही त्या सूचनांचे पालन केले असते. मात्र त्यांनी त्या ठिकाणी आमच्याशी योग्य पद्धतीने संवाद साधला आणि कोणत्याही प्रकारची बाचाबाची अथवा ज्या पद्धतीने फिर्यादी मध्ये उल्लेख केला आहे तशी घटना घडलेली नाही. याबाबतचे सर्व व्हिडिओ फुटेज आहेत. ते पत्रकार परिषदे दाखवत काळे म्हणाले आम्ही पोलिसांची भेट घेऊन त्यांना देखील हे सर्व फुटेज उपलब्ध करून देणार असून त्यांच्याकडे कंपनीने दिलेले फुटेज आणि आमचे फुटेज त्याची पडताळणी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी लवकरच होईल आणि नगरकरा समोर सत्य काय आहे ते येईल. आमचा कायदा सुव्यवस्था यंत्रणेवर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

Comments are closed.