सेलू :- सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा उत्सवा निमित्ताने येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.एल एम सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दत्ताकाका मंडलिक, महेश खारकर, उज्वला मालाणी, मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर, सुभाष नावकर यांची होती. स्पर्धेचे हे 12 वे वर्ष असुन या वेळी रंगभरण, सामान्यज्ञान, कथाकथन, वेशभूषा व निबंध स्पर्धेचे आयोजन इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.
या प्रसंगी शेक हॅंड फाउंडेशनच्या वतीने दहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विविध स्पर्धेत सेलू शहरातील नुतन विद्यालय, स्वामी विवेकानंद शाळा, नुतन कन्या, यशवंत विद्यालय, जिजामाता विद्यालय, माॅडर्न इंग्लिश स्कुल, नुतन इंग्लिश स्कुल या शाळांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बालासाहेब हळणे, माणिक हजारे, अलका धर्माधिकारी, संजय धारासूरकर, अमिता जवळेकर, कृष्णा पांचाळ, सिद्धार्थ एडके, नरेश पाटील, सुचिता पितळे, किर्ती कुलकर्णी, जयश्री सोन्नेकर, रूपाली कुर्डे, योगेश ढवारे, शुभांगी भाग्यवंत, किशोर खारकर, सर्जेराव सोळंके, मुरलीधर खरात, नामदेव क्षीरसागर, प्रविण चव्हाण आदींसह सेवक विठ्ठल काळे, अन्नासाहेब गायकवाड, पदमिनबाई मुंडे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कुलकर्णी यांनी केले तर आभार दिलीप बेदरकर यांनी मानले.
डाॅ विलास मोरे, सेलू
Comments are closed.