Take a fresh look at your lifestyle.

Road Accidents: केरळचे ‘हे’ मॉडेल अवलंबले तर वाचू शकतात हजारो लोकांचे प्राण

केरळ: देशभरात रोड अपघातात गंभीर जखमी होणार्‍यांची संख्या केरळमध्ये जास्त आहे. तसेच सर्वाधिक रोड अपघात होणार्‍या राज्यांच्या यादीत केरळ चौथ्या स्थानी आहे. एवढे लोक गंभीर जखमी होऊन सुद्धा केरळमध्ये रोड अपघातात मृत्यू होणार्‍यांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहे. रस्ते अपघातांच्या तुलनेत येथे केवळ 10 टक्के मृत्यू होतात, तर इतर राज्यांमध्ये मृत्यूचा आकडा 20 ते 25 टक्क्यांपर्यंत जातो. यासंदर्भात, रस्ता सुरक्षेचे तज्ञ, ट्रॉमा सेंटरचे डॉक्टर आणि वाहतूक आयुक्तांचे मत आहे की चांगले ट्रॉमा केअर सेंटर आणि वाहतुकीच्या नियमांबाबत काटेकोरपणा हे मुख्य कारण आहे

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या परिवहन संशोधन शाखेच्या अहवालानुसार, केरळमध्ये गंभीर जखमींची संख्या वार्षिक 29569 आहे, जी देशात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर या राज्यातील रस्ते अपघातांची आकडेवारी पाहिली तर तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश नंतर केरळ हे चौथ्या स्थानी आहे, केरळमध्ये मध्ये एका वर्षात सरासरी  41,111 रस्ते अपघात होतात . असे असूनही, रस्ते अपघातांमुळे केवळ सरासरी 4183 लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

जर केरळ मधील एकूण गंभीर जखमी आणि मृत्यूंची तुलना केली तर हा आकडा 14 टक्क्यांच्या जवळ येतो. अपघातात गंभीर जखमी होणार्‍या राज्यात  कर्नाटकचा दुसरा क्रमांक आहे, पण गंभीर जखमींच्या तुलनेत मृतांचा आकडा 57 टक्क्यांहून अधिक आहे. रस्ते अपघातात अनेक लोक जागीच मरण पावतात, परंतु गंभीर जखमींना वेळीच ट्रॉमा केअर मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात. असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: रस्ते अपघातांवर चिंता व्यक्त केली असून, अपघात कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

जाणून घ्या केरळ मॉडेल:

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन

केरळचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) आणि परिवहन आयुक्त ऋषी राज सिंह यांनी सांगितले की, केरळमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे हे रस्ते अपघातात मृत्यू कमी होण्याचे एक महत्वाचे कारण आहे. रस्ते अपघातांमध्ये बहुतांश मृत्यू डोक्याला झालेल्या जखमांमुळे होतात. केरळमध्ये हेल्मेट आणि सीट बेल्टचे नियम काटेकोरपणे पाळले जातात, ज्यामुळे एखादी व्यक्ती रस्ते अपघातात गंभीर जखमी होते परंतु डोक्याच्या सुरक्षेमुळे जीव वाचतो.

चांगले ट्रॉमा सेंटर जीव वाचवतात

सेव्ह लाइफ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी यांनी सांगितले की, केरळमध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर सुद्धा मृत्यू कमी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे जखमींना वेळेवर ट्रॉमा केअर मध्ये प्रवेश मिळतो. यामध्ये रुग्णवाहिका रुग्णालय आणि उपचार या सर्व गोष्टींचा समावेश आहे. केरळमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत, ज्यामुळे जखमी व्यक्तीला तेथे चांगले प्राथमिक उपचार मिळू लागतात.

चुकीच्या पद्धतीने हॉस्पिटल किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये पोहचवल्यानेही जखमीची स्थिती बिघडते

अनेक वेळा रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात किंवा ट्रॉमा सेंटरवर वेळेवर नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसते, त्यामुळे लोक दुचाकी, ऑटो किंवा खाजगी वाहन वापरून जखमींना पोहोचवतात. जखमींना हॉस्पिटलला नेणारे वाहन योग्य पद्धतीने पोहचू न शकल्याने जखमींची अवस्था बिकट होते.

Comments are closed.