Take a fresh look at your lifestyle.

पुरामुळे शेतात अडकलेल्या 6 व्यक्तींची केली सुटका..पहा कोण आहेत ते

परभणी – परभणी तालुक्यातील झरी जवळ मौजे सावांगी येथे दुधना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एका शेतातील आखड्यावर बुधवार रोजी रात्री पासून 4 पुरुष 1 लाहान मूल आणि एक महिला असे एकूण 6 व्यक्ती अडकले होते. या बाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत पाठवली, त्यानंतर गुरुवारी रेस्क्यू टीमने पुरात अडकलेल्या सर्वांना सुरक्षित रित्या रेस्क्यू केले.

इतर कोणतेही हानी नाही, तसेच सदर बचाव मोहीम अग्निशमन विभाग , परभणी मनपा आणि अग्निशमन विभाग पाथरी नपा यांच्या पथकाने संयुक्त रित्या यशस्वीपणे राबविले. बचाव मोहिमे दरम्यान तहसीलदार परभणी संजय बिराजदार, नायब तहसीलदार गणेश चव्हाण पोलीस निरीक्षक राहिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके हे घटनास्थळी उपस्थित होते.

Comments are closed.