Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…जर घरात ‘हे’ चॉकलेट ठेवत असाल तर सावधान; होऊ शकते अटक

मुंबई : घरात दारूचा मर्यादेपेक्षा जास्त साठा , अमली पदार्थ इत्यादि  गोष्टी आढळल्यास अटक झाल्याचे आपण नेहमी ऐकतो, पण घरात चॉकलेट ठेवल्याने अटक झाल्याचे ऐकले का? ऐकायला अजब वाटत असले तरी हे खरं  आहे. तुमच्या घरात जर हे चॉकलेट असेल तर तुम्हाला होऊ शकते अटक. या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेउया.

महाराष्ट्रात मात्र दारू पिण्यावर आणि दारूचा मर्यादित साठा (लीगल) घरात ठेवण्यावर कोणतेही बंधन नाही. पण जर तुम्ही दारूपासून बनवलेली चॉकलेट (Alcoholic  Chocolates) घरी ठेवली किंवा बनवली तर तुम्हाला अटकही होऊ शकते. दरवर्षी महाराष्ट्र पोलीस अनेक किलो दारूपासून बनवलेली चॉकलेट जप्त करतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरातून 46.5 किलो वजनाचे आयात केलेले दारूचे  चॉकलेट जप्त केले. त्याची किंमत 4.31 लाख सांगितली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील राज्य उत्पादन आणि दारूबंदी व्यवस्था अल्कोहोलीक  चॉकलेटचे उत्पादन, विक्री आणि साठवणूक करण्यास परवानगी देत ​​नाही. कारण अल्पवयीन मुले या चॉकलेटचा वापर करण्याची शक्यता वाढते.

अल्कोहोलीक  चॉकलेटवर छापा

उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संतोष जगदाळे आणि प्रसाद सास्तूरकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे 23 ऑगस्ट 2021 रोजी एका दुकानावर छापा टाकला. येथे अल्कोहोलिक चॉकलेट डेन्मार्कमधून आयात करण्यात येत होते आणि इथे विकल्या जात होत्या. यातील काही चॉकलेट्स 187 ग्रॅम वजनाच्या 12 तुकड्यांसाठी 1,650 रुपये किंमतीला विकल्या जात आहेत.  छापेमारीत एकूण अल्कोहोलिक चोक्लेट्सचे 175 पाकिटे जप्त करण्यात आली आणि एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी 25 ऑगस्ट रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

यापूर्वी सुद्धा झाली होती अशीच कारवाई

महाराष्ट्रात मद्यपी चॉकलेट जप्त करण्यासाठी वेळोवेळी कारवाई केली जाते. डिसेंबर 2019 मध्ये अशाच एका गर्दीच्या बाजारपेठेत केलेल्या छाप्यात 18 हजार रुपये किमतीचे मद्य चॉकलेट जप्त करण्यात आले होते. 2012 मध्ये वरळी येथील 53 वर्षीय चॉकलेट व्यावसायिक प्रीती चंद्रायणी यांना घरी अल्कोहोलिक चॉकलेट बनवल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून ताब्यात घेतले. चंद्रायणीला परमिटशिवाय सुमारे 20 बाटल्या दारू आणि चॉकलेटचे बॉक्स बाळगल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते.

Comments are closed.