Take a fresh look at your lifestyle.

अरे वाह…जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next ची किंमत आणि वैशिष्ट्य झाले लिक, ‘या’ तारखेपासून होईल उपलब्ध

टेक: रिलायन्स जिओने जूनमध्ये त्यांच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन जिओफोन नेक्स्ट सादर केले होते. त्यांनी फोनची किंमत आणि वैशिष्ट्यांविषयी माहिती अधिकृतपणे दिली नव्हती.

फोन विक्रीसाठी 10 सप्टेंबर पासून उपब्ध होण्याचची शक्यता

जिओफोन नेक्स्ट रिलायन्स जिओ आणि गुगलच्या भागीदारीत तयार करण्यात आला आहे. जिओफोन नेक्स्टची विक्री भारतीय बाजारात 10 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, त्याआधीच फोनच्या वैशिष्ट्यांविषयी लिक झालेले रिपोर्ट समोर येत आहेत.

काही दिवसांपूर्वी फोनची काही वैशिष्ट्ये लिक झाले होते आणि आता जिओफोन नेक्स्टच्या किंमतीसंदर्भात एक लीक रिपोर्ट देखील समोर आला आहे. या लेखात आपण जिओफोन नेक्स्टची किंमत आणि वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया …

किंमत असेल 3500 पेक्षा कमी

किंमतीबद्दल बोलयाचे झाले तर , प्राप्त महितीनुसार, जिओफोन नेक्स्टची किंमत 3,499 रुपये असेल. तसेच या फोनची विक्री 10 सप्टेंबरपासून सुरू होईल. यापूर्वीच्या एका अहवालात जिओ फोन नेक्स्टची किंमत $ 50 पेक्षा कमी असेल असा दावा करण्यात आला होता.

असे असतील फिचर्स

JioPhone Next मध्ये Android 11 ची गो एडिशन उपलब्ध असेल. याशिवाय फोनमध्ये 5.5 इंचाचा HD डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये क्वालकॉमचा क्यूएम 215 प्रोसेसर, 2 किंवा 3 जीबी रॅम आणि 16 किंवा 32 जीबी स्टोरेज मिळेल. ग्राफिक्ससाठी Adreno 308 GPU उपलब्ध असेल.

मिळेल जबरदस्त कॅमेरा

जिओफोन नेक्स्टमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच, फोनमध्ये 4G VoLTE सह ड्युअल सिम सपोर्ट आणि 2500mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी X5 LTE मोडेम आणि ब्लूटूथ v4.2 ला सपोर्ट करेल, तसेच GPS  ही मिळेल.

Comments are closed.