Take a fresh look at your lifestyle.

सेलू तालुक्यातील ग्रामस्थांशी ना. जयंत पाटलांनी साधला संवाद ! दुधना व कसूरा नदीवर बंधारे बांधण्याचे दिले आश्वासन

सेलू (डाॅ विलास मोरे) :- नागरीकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान दुधना व कसूरा नदीवर लवकरच बंधारे बांधण्याचे काम सुरू करू असे आश्वासन सेलू तालुक्यातील ग्रामस्थांशी संवाद साधताना ना. जयंत पाटील यांनी दिले.

शहरातील श्रीराम प्रतिष्ठानच्या विद्याविहार संकुलात शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी तालुक्यातील नागरीकांसोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, वासिम जिल्हा पक्ष निरिक्षक डाॅ संजय रोडगे, बाळासाहेब रोडगे, डॉ आदित्य रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दुधना व कसुरा नदीवर अवलंबून असणारी गावे पाण्यासाठी मुख्यस्त्रोतात आणण्यासाठी प्रत्येकी ५ बंधारे बांधण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली.

तसेच औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी होऊ घातलेल्या प्रलंबित MIDC चे काम लवकर सुरु करून तालुक्यातील रस्ते दुरूस्तीची कामे लवकर मार्गी लावावी अशा विविध मागण्या निवेदनात नमुद केल्या होत्या. नागरीकांच्या मागण्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असे जल संपदा मंत्री जयंत पाटील आश्वासन दिले. यावेळी सेलू तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय ठाकर यांनी केले तर आभार डॉ. आदित्य रोडगे यांनी मानले.

Comments are closed.