Take a fresh look at your lifestyle.

भाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय – जयंत पाटील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा पहिला दिवस…

परभणी – जिंतूर दि. २४ सप्टेंबर – आज महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमध्ये शर्यत लागली आहे. पण बातम्यांवर काहीच दाखवले जात नाही. तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातंय मात्र इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला.

भाजपचे चुकीचे धोरण समोर मांडत जनसामान्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करा. या भागात आपल्याला आपल्या विचारांचा आपला माणूस निवडून आणायचा आहे असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

आज ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला त्यांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले. विजय भांबळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदनही केले.

मागच्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राष्ट्रवादीला अपयश आले. एक प्रभावी, उमद्या नेतृत्वाचा पराभव झाला. सर्व काही असताना विजय भांबळे यांना पराभव स्विकारावा लागला. बुथ कमिट्या जर मजबूत असतील तर आपला पराभव शक्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरज, मागे पुढे न पाहता संपूर्ण कार्यकारिणी झाडून काढा. कोणतीही तमा न बाळगता निष्क्रीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.

आपल्या कॅडरशी संवाद साधा, त्यांच्यासाठी शिबिरं घ्या त्यांना पक्षाबाबत पक्षाच्या कामाबाबत माहिती द्या. बुथ कमिटीच्या लोकांनी स्थानिक पातळीवर काम करावे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. त्याच्या अडीअडचणीला धावून जावे असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

ज्या बुथ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सर्वसमावेशक कार्यकर्त्यांची फळी असली पाहिजे. विरोधकांनी कितीही खर्च केला तरी आपलं सैन्य जर जागं असेल दगाफटका निवडणुकीत होत नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले. या मतदारसंघात सर्वाधिक निधी देऊन विजय भांबळे यांचे हात मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले.

सकाळी जलसंपदा विभागाची बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी परभणी ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची नंतर जिंतूर विधानसभा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.

या संवाद यात्रेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी मार्गदर्शन केले.

या संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इतर पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात जयंत पाटील यांनी स्वागत केले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार फौजिया खान, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, परभणी निरीक्षक बसवराज नागराळकर, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय भांबळे, राजेश वीटेकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, मराठवाडा महिला निरीक्षक रेखा फड, महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, मराठवाडा समन्वयक प्रज्ञाताई खोसरे आदी उपस्थित होते.

Comments are closed.