परभणी : भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून दिनांक २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
देशभरातील १०० पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला खासदार फौजिया खान, आ.राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल उपस्थित होत्या.
Comments are closed.