Take a fresh look at your lifestyle.

ईडी आणि सीबीआयची कारवाई भाजपला कळतेच कशी : जयंत पाटील यांचा प्रश्न

नगर : ईडी आणि सीबीआयची कारवाई भाजपला कळत दूध कसे कोणतेही प्रकरण ओढून-ताणून तयार करायचे आणि राज्यातील मंत्र्यांना बदनाम करायचे असा कार्यक्रम भाजपने सुरू केला आहे. ईडी आणि सीबीआयची कार्यालय म्हणजेच भाजपची कार्यालय झाली आहेत असा घणाघाती आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

अहमदनगर येथे भावा बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी नुकताच त्यांनी वार्तालाप केला. जयंत पाटील म्हणाले” जे खरे मनी लॉन्ड्रिंग करत आहेत त्यांना सोडून दिले जात आहेत तर कारण नसतानाही चांगल्या माणसांवर बिनबुडाचे आरोप करत भाजपने राज्यातील मंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र त्यांना जाणीवपूर्वक गुन्ह्यात गोव्याचे काम केले जात आहे.

त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले परंतु त्यांनी भाजपात प्रवेश केला त्यांच्या गुन्ह्याचे काय झाले? पाहिजे तर त्यांची यादी आम्ही देतो. गुन्हे असले तरी भाजपमध्ये प्रवेश केला की त्यांना ईडी आणि सीबीआय कडून संरक्षण दिले जात असल्याचे चित्र आहे. केवळ संभाषणाच्या क्लिप वर अनिल देशमुख यांना ईडीने ताब्यात घेतले.

वास्तविक पैसे दिले नाहीत आणि घेतलेली नाहीत. वास्तविक चौकशी सुरू असल्यामुळे पदावर राहणे योग्य नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला असे जयंत पाटील म्हणाले जयंत पाटील यांनी भाजपच्या अनेक बाबीवर आक्षेप घेत सडकून टीका केली

Comments are closed.