Take a fresh look at your lifestyle.

अरे वाह…आयफोन 13 सीरीज लॉन्च होण्याची तारीख झाली लीक, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

टेक: प्रीमियम स्मार्टफोन्स दुनियेतील दिग्गज कंपनी Apple ने  iPhone 13 मालिका लवकरच लॉन्च करू शकते,  तसेच 17 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डर सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. Apple च्या या मालिकेत (iPhone 13 Series) आयफोन 13 मिनी, आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश असेल.

टीपस्टर जॉन प्रॉसर (जॉनच्या वेबसाइट FrontPageTech ) च्या मते, Apple iPhone 13 मालिका 24 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल. तथापि, हा लीक झालेला अहवाल भारतीय मार्केट साठी देखील लागू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

आतापर्यंत iPhone 13 मालिकेबद्दल अनेक लीक रिपोर्ट्स समोर आले आहेत.  सर्व रिपोर्ट्स मध्ये  चारही आयफोन बदल माहिती शेअर करण्यात आली. तसेच  कधीकधी त्यांचे पूर्ण फोटो देखील पोस्ट करण्यात आले. तर या लेखात आपण आतापर्यंत समोर आलेल्या iPhone 13 मालिकेचे तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

अशी असेल डिझाईन 

डिझाईन बद्दल बोलायचे तर, iPhone 13 आणि iPhone 13 Mini मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, तर प्रो व्हेरिएंट मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. डमी युनिटमध्ये मोठ्या सेन्सर आणि ड्युअल कॅमेऱ्यांची प्लेसमेंट दिसली आहे. डमी मॉडेलला लेसर सेन्सर आणि एलईडी फ्लॅश देखील दाखवण्यात आला आहे.

बॅटरी क्षमता वाढवण्यात येऊ शकते 

अलीकडील फर्म रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की Apple यावेळी त्यांच्या  डिव्हाइसची बॅटरी क्षमता देखील वाढवणार आहे.तसेच  Apple iPhone 13 हा उच्च-रीफ्रेश-रेट डिस्प्लेसह येईल. नवीन आयफोनमध्ये iPhone 12 सीरीजपेक्षा चांगली 5G कनेक्टिव्हिटी असेल. 

आयफोन 13 सीरीजची किंमत किती असेल?
किंमतीबद्दल  बोलायचे झाले तर , मार्केट फर्म ट्रेंडफोर्स नुसार,  iPhone 13 च्या किंमतीत कोणतीही लक्षणीय वाढ होणार नाही. त्यांच्या किंमती आधीच्या मॉडेल म्हणजेच iPhone 12 सारख्याच असतील.  iphone 13 ची किरकोळ किंमत iPhone 12 सीरीज सारखीच असेल. मात्र, फोनची खरी वैशिष्ट्ये आणि किंमत लॉन्च झाल्यानंतरच कळतील .

नोट ( Disclaimer ) : वरील सर्व माहिती इंटरनेट वरील विश्वसार्ह, परंतु अधिकृत नसलेल्या दिग्गज टेक साईट्स वरून घेण्यात आली आहे. अधिकृत माहिती साठी Apple  कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शहानिशा करून घ्यावी.

Comments are closed.