Take a fresh look at your lifestyle.

अजिंठा-वेरूळ परिसरात आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र, धनंजय मुंडे यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

मुंबई: जागतिक वारसा यादीत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा-वेरूळ येथी आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या विकाससाठी सामाजिक न्याय विभागाद्वारे जमीन आणि निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

याविषयावर सह्याद्रि अतिथीगृह येथे धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.  या बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, सहसचिव दि.रा.डिंगळे, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या एम.आर.पिंपरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या उपलब्ध जागेचा विचार

अजिंठा-वेरूळ या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाला जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्राच्या माध्यमातून बौद्धकालीन चित्रांचे जतन करणे आवाश्यक आहे. असे धनंजय मुंडे म्हणाले. या प्रकल्पासाठी लागणार्‍या जागेकरिता परिसरातील सामाजिक न्याय विभागाच्या उपलबद्ध जागेचा विचार करता येईल. तसेच जागेची निश्चिती करून तसा प्रस्ताव शासनाला सादर करावा, त्यावर लगेच कार्यवाही करण्यात येईल, असंही मुंडे यांनी मुंडे यावेळी म्हणाले.

यावेळी बैठकीत एम.आर.पिंपरे यांनी केंद्रातील कामांबाबत सादरीकरण केले. तसेच या प्रकल्पाचे उद्दिष्ट, जागा आणि अंदाजित खर्चाची माहिती दिली.

Comments are closed.