Take a fresh look at your lifestyle.

युवा पिढीच्या प्रयत्नांमुळे 2047 चा भारत सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त असेल: राष्ट्रपती रामनाथ कोविंद

लखनऊ: आजच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांमुळे 2047 चा भारत सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या शताब्दी पर्यंत भारतात समतावादी समाज स्थापन करण्याच्या कामात सर्व तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यापीठाच्या दीक्षात समारंभ कार्याक्रांत विद्यार्थ्यांना संबोधित केले

लखनऊ येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाले, “मला विश्वास आहे की आजच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांमुळे 2047 चा भारत सर्व प्रकारच्या भेदभावापासून मुक्त होईल आणि विकसित देश म्हणून ओळखला जाईल. तसेच, भविष्यातील भारतात न्याय, समानता आणि बंधुत्वाचे घटनात्मक आदर्श, आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाशी पूर्णपणे जुळवून घेतलेले असू.”

स्वावलंबी बनण्याचे केले आवाहन

“2047 मध्ये आपण (भारत) सर्वसमावेशक जागतिक व्यवस्थेत निर्णायक भूमिका बजावणार आहोत. अशा समतातुल्य आणि मजबूत भारताच्या उभारणीसाठी आपणा सर्वांना आजपासून निर्धाराने एकत्र यावे लागेल.” असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. त्याबरोबरच तुम्ही सर्वांनी (तरुणांनी) भारताला विकासाच्या कल्पने पलिकडच्या उंचीवर नेले पाहिजे. हे बाबासाहेबांचे स्वप्न होते आणि आपण सर्वांनी मिळून ते पूर्ण केले पाहिजे. याचीही जाणीव त्यांनी तरुणांना करून दिली.

नोकरी देणारे बना

राष्ट्रपती कोविंद यांनी दीक्षांत समारंभात पदवी धारण केलेल्या सर्व युवकांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, ‘तुम्ही नोकरी शोधणाऱ्याऐवजी नोकरी देणारे बनायला हवे’.

बाबासाहेबांच्या कार्याचे केले गुणगान

बाबासाहेबांच्या योगदानाचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले, “आपल्या सर्वांना माहित आहे की, जगातील महान तत्वज्ञ असण्याव्यतिरिक्त, बाबासाहेब आंबेडकरांनी बँकिंग, सिंचन, वीज, कामगार व्यवस्थापन प्रणाली, महसूल वाटप व्यवस्था आणि शिक्षण इत्यादी क्षेत्रात भरीव  काम  केले.”

बाबासाहेब केवळ शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित, राजकारणी, पत्रकार, समाजसुधारक आणि समाजशास्त्रज्ञ नव्हते तर त्यांनी संस्कृती, धर्म आणि अध्यात्मातही त्यांचे अमूल्य योगदान दिले असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

यावेळी पदवी, पदव्युत्तर पदवी, पीएचडी ,एम. फिल आणि इतर अभ्यासक्रमांच्या 1424 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी सहा जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आले. यावेळी राष्ट्रपतींनी सावित्रीबाई फुले कन्या वसतिगृहाची पायाभरणीही केली. या कार्यक्रमादरम्यान राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित होते.

Comments are closed.