Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराने केले धक्कादायक वक्तव्य, म्हणाले ‘बूमरा आणि शमीच्या आई-वडिलांनी…’

लंडन: लॉर्ड्सवर भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केल्यापासून इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे. इंग्लंडच्या माजी दिग्गज खेळाडूंना तसेच क्रिकेट तज्ञांना त्यांच्या संघाने जवळपास जिंकलेला सामना कसा गमावला यावर विश्वास बसत नाही. आता इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गोवरनेही भारताच्या विजयावर मोठे विधान केले आहे. मात्र, डेव्हिड गोवरने इंग्लंड संघावर टीका केली आणि सांगितले की भावनेच्या भरात त्यांनी हा सामना गमावला. त्याचबरोबर त्यांनी भारत कसोटी मालिकेत 1-0 ने पुढे आहे आणि ते त्यास पात्र असल्याचेही म्हणाले.

डेव्हिड गोवरने  शमी आणि बुमराहच्या भागीदारीवर एक अतिशय रोचक विधान करत म्हटले की, या दोन खेळाडूंच्या आई-वडिलांनाही वाटले नसेल की हे दोघे एवढी मोठी भागीदारी करतील.

भारतीय संघाचे केले कौतुक

डेव्हिड गोवरने क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, ‘जग पूर्णपणे वेडे झाले आहे. जेव्हा लोकांनी पाहिले की मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. कोणीही, त्याचे आईवडील, त्याचे कुटुंब, कोणीही याची कल्पनाही करू शकत नव्हते.’ सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता पण शमी आणि बुमराहने 9 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करून संपूर्ण सामना फिरवला. भारतीय संघाने इंग्लंडला 272 धावांचे लक्ष्य दिले होते, प्रत्युत्तरात यजमान संघ केवळ 120 धावांवर सर्वबाद झाला.

गोवर यांचे विश्लेषण– इंग्लंड कुठे हरला?

डेव्हिड गोवर यांनी सांगितले की, अँडरसन-बुमराह यांच्यातील वादानंतर इंग्लंडचा संघ भावनांमध्ये उडाला होता, ज्याचा त्यांना परिणाम भोगावा लागला. गोवर म्हणाले, ‘पाचव्या दिवसाची मनोरंजक गोष्ट म्हणजे बडल्याच्या भावनेने इंग्लंड संघावर खूप वर्चस्व गाजवले. होय, बुमराह-अँडरसन यांच्यातील वादानंतर इंग्लंड संघाच्या भावना शिगेला पोहोचल्या होत्या, पण त्यांना नियंत्रित करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जो रूटला हे देखील मान्य करावे लागेल की त्याची रणनीती पूर्णपणे चुकीची ठरली. असेही गोवर म्हणाले.

तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी लीड्समध्ये खेळली जाईल. 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ लीड्सला पोहोचला आहे. लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय संघाचा उत्साह चांगलाच  उंचावला असून, दुसरीकडे यजमानांनी पलटवार करण्यासाठी त्यांच्या संघात बदल केले आहेत. डेव्हिड मलानला कसोटी संघात स्थान मिळाले असून, वेगवान गोलंदाज साकिब महमूदचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर डोम सिबलीला खराब कामगिरीमुळे संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका