Take a fresh look at your lifestyle.

IND vs ENG: इंग्लंडच्या ‘या’ पाच खेळाडूंपासून आहे भारताला धोका, कसोटी मालिकेत ठरू शकतात निर्णायक

लंडन: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी (IND vs ENG) जोरदार तयारी केली आहे. घरच्या मैदानावर इंग्लिश संघाची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. अशा परिस्थितीत जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाला हा पराक्रम पुन्हा एकदा करायला आवडेल. टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये 62 कसोटी सामने खेळले आहेत, यात फक्त 7 मध्ये  भारतीय संघाने विजय मिळवला असून, इंग्लंडने 34 सामने जिंकले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 4 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. या मालिकेत इंग्लंडचे हे 5 खेळाडू टीम इंडियाविरुद्ध मोठी डोकेदुखी ठरू शकतात:

जो रूट: टीम इंडियाविरुद्ध कर्णधार जो रूटची कामगिरी खूप चांगली झाली आहे. त्याने भारताविरुद्ध खेळलेल्या 20 कसोटीत 5 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. एवढेच नाही तर 54 च्या सरासरीने 1789 धावा बनवल्या. 218 धावांची सर्वोच्च खेळी. अशा स्थितीत टीम इंडियाला जो रूटला रोखणे सोपे असणार नाही. इंग्लिश फलंदाज म्हणून भारताविरुद्ध सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. अॅलिस्टर कुकने सर्वाधिक 2431 धावा केल्या आहेत.

जोस बटलर: यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने इंग्लंडच्या कसोटी विजयात नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्याने भारताविरुद्ध 12 कसोटीत 42 च्या सरासरीने 757 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.

जेम्स अँडरसन: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज आहे. भारताविरुद्ध त्याची कामगिरी शानदार असून, त्याने भारताविरुद्ध 30 कसोटी सामन्यात 118 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लिश गोलंदाज म्हणून ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताविरुद्ध त्याने चार वेळा एकाच इनिंग्समध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

स्टुअर्ट ब्रॉड: वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसुद्धा इंग्लंडच्या खेळपट्टीवर प्रभावी आहे. त्याने भारताविरुद्ध 22 कसोटीत 27 च्या सरासरीने 70 विकेट्स घेतल्या आहेत. दोनदा त्याएन एका 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 25 धावादेऊन 6 विकेट्स आहे. अँडरसन आणि ब्रॉडची जोडी अत्यंत धोकादायक मानली जाते.

सॅम करेन: अष्टपैलू सॅम करेन कसोटी मालिकेतही इंग्लंडसाठी महत्त्वाचा खेळाडू सिद्ध होऊ शकतो. बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत सर्वांची नजर कॅरनवरच असेल आणि त्यानेसुद्धा भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याने भारताविरुद्ध 4 कसोटीत 39 च्या सरासरीने 272 धावा केल्या आहेत. तसेच 2 अर्धशतके ठोकली आहेत. गोलंदाजी करताना 24 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका