Take a fresh look at your lifestyle.

IND vs ENG : चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होऊ शकतो बदल, जाणून घ्या कशी असेल Playing 11

क्रिकेट : लॉर्ड्सवर शानदार विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यात एक डाव आणि 76 धावांनी पराभव पत्करावा लागला. सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 ने बरोबरीत आहे आणि आता ओव्हलमध्ये (India vs England, 4th Test) दोन्ही संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या  उद्देशाने मैदानात उतरतील. ओव्हल कसोटीत भारतीय संघ काही बदलांसह  उतरू शकतो (India Probable Playing 11). हेडिंगले कसोटीत सामना गमावल्यानंतरच विराट कोहलीने संघात काही बदल करणार असण्याचे सूचक वक्तव्य केले होते.  वेगवान गोलंदाजांना सतत कसोटी सामने खेळू देणे त्यांच्यावर अत्याचार होईल आणि ते जखमी होऊ शकतात.

फिरकीपटू अश्विनला मिळू शकते संधी 

टीम इंडिया फक्त एका बदलासह ओव्हल कसोटीत उतरू शकते. या सामन्यात ईशांत शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते आणि ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला त्याच्या जागी संधी मिळू शकते, जो या कसोटी मालिकेत आतापर्यंत खेळला नाही. ओव्हलची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे आणि त्यामुळे भारतीय संघ अश्विन आणि रवींद्र जडेजासोबत मैदानात उतरेल अशी शक्यता आहे.

खेळपट्टीचा विचार करून घेण्यात येईल निर्णय 

टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण म्हणाले की, अश्विनच्या खेळाबाबतचा अंतिम  निर्णय नाणेफेक करण्यापूर्वी घेतला जाईल. भारतीय फिरकी आक्रमण पाहता इंग्लंडचा संघ ओव्हलमधील खेळपट्टीमध्ये बदल करू शकतो, त्यामुळे खेळपट्टीच्या अंतिम बदलानंतर अश्विनच्या खेळण्याविषयी निर्णय घेण्यात येईल.

रहाणेला संधी मिळेल का?
या मालिकेतील खराब फॉर्ममुळे रहाणेच्या जागेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्या जागी हनुमा विहारी किंवा सूर्यकुमार यादव यांना संधी देण्याची सतत मागणी होत आहे. पण टीम इंडिया व्यवस्थापनाचा विचार लक्षात घेता तसे करणे कठीण आहे. भारतीय संघ वाईट काळात ही  आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभा असतो . तिसऱ्या कसोटीपूर्वी पुजारा विषयी सुद्धा अशाच गोष्टी केल्या जात होत्या, पण हेडिंग्लेच्या दुसऱ्या डावात त्याने ९१ धावांच्या उत्कृष्ट खेळीने त्याने समीक्षकांचे तोंड बंद केले.

तसेच , रहाणे आणि कर्णधार कोहलीचा खराब फॉर्म चिंतेचा विषय आहे. ऋषभ पंतही धावा बनऊ शकत नाहीए.  असे असले तरीही  भारतीय संघ फक्त एका बदलासह ओव्हलमध्ये खेळू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतीय संभाव्य एकादश 

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार ), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार ), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह और मोहम्मद शमी.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका