Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक: सरकारी तज्ञांच्या ‘या’ सल्ल्यांचे पालन केले तर येणार नाही कोरोंनाची तिसरी लाट

नवी दिल्ली: एप्रिल ते जुलै दरम्यान देशात कोरोंनाच्या दुसर्‍या लाटेमुळे लाखो लोक कोरोनाबाधित झाले. तसेच लाखो लोकांचा मृत्यू झाला.  मागील काही आठवड्यापासून कोरोंनाची दुसरी लाट मंदावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी सुरू असलेले कोविड निर्बंध शिथिल केले आहेत.

तिसर्‍या लाटेला बोलावले तरच ती येईल…

कोरोनाच्या दुसऱ्या भीषण लाटेनंतर आता तिसऱ्या लाटेबद्दलही चर्चा तीव्र झाल्या आहेत. पण सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागातील सचिव डॉ.रेणू स्वरूप यांनी सांगितले की, तिसरी लाट तेव्हाच येईल जेव्हा ‘तिला बोलावले जाईल’. ते म्हणाले की तिसरी लाट फक्त दोन प्रकारे बोलवली जाऊ शकते – पहिली, मानवी वर्तनाद्वारे आणि दुसरी विषाणूच्या बदलत्या स्वरूपाद्वारे.

स्वतःच्या वर्तनावर नियंत्रन ठेवावे लागेल

कोरोंना विषाणूचे वर्तन आणि बदलते स्वरूप याबाबत त्यांनी सांगितले की, आपण त्याच्या उत्परिवर्तनाच्या स्वरूपाबद्दल जाणतो परंतु आपले त्याच्यावर नियंत्रण नाही. पण आपले मानवी वर्तनवर नियंत्रण आहे. जर कोरोनापासून बचावाशी संबंधित सर्व पद्धती आपल्या जीवनशैलीमध्ये स्वीकारल्या जाऊ शकतात. जर आपण कोरोनाशी संबंधित योग्य वर्तन स्वीकारले तर आपण विषाणूची साखळी तोडू शकतो. कोरोनाचे नियम योग्य प्रकारे पाळले तर आपण कोरोनाला एका व्यक्तिपासून दुसर्‍या व्यक्तीकडे पोहोचण्यास विषाणूला आपण रोखू शकतो. यासाठी फक्त स्वतःच्या वर्तनावर नियंत्रन ठेवावे लागेल. असे डॉ. रेणु स्वरूप यांनी सांगितले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा अहवाल

अलीकडेच, NITI आयोगाकडून कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याबाबत चेतावणी देण्यात आली आहे. यासह, आता गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांच्या समितीने देखील एक अतिशय धक्कादायक अहवाल सादर केला आहे. त्यांच्या मते, ऑक्टोबरमध्ये देशात कोरोना विषाणूचा संसर्ग शिगेला पोहोचेल. त्यावेळीच कोरोनाची तिसरी लाट देखील शक्य आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांना जास्त धोका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लहान मुलाविषयी आरोग्य सुविधांची कमतरता

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालात कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी म्हटले आहे की, तिसर्‍या लाटेत जर लहान मुले मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली तर त्यांच्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, व्हेंटिलेटर आणि रुग्णवाहिका यासारख्या बालरोगविषयक सेवा कुठेही उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. लहान मुलांना अजूनही कोरोनाची लस देणे सुरू झाले नसल्यामुळे पालक वर्ग चिंतित आहे.

 

Comments are closed.