Take a fresh look at your lifestyle.

बाबो.. लिम्का बुकमध्ये नाव असणाऱ्या ‘या’ IAS अधिकारी ईडीच्या कचाट्यात; घरात सापडलं एवढ्या कोटींचे घबाड

मुंबई :

आयएएस (IAS) अधिकारी आणि झारखंडच्या खाणकाम आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल (Pooja Singhal) यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली. ईडीने एकाचवेळी 20 ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 25 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे.

ईडीनं पूजा सिंघल यांचे सासरे कामेश्वर झा यांना अटक केली आहे. मधुबनी येथील निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. ईडीकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. झारखंड, बिहार, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील मुंबईमध्ये ईडीनं एकाच वेळी छापे टाकले आहेत. रांचीमधील पंचवटी रेसिडेन्सी, ब्लॉक नंबर ९, चांदणी चौकातील हरिओम टॉवर, नवी बिल्डींग, लालपूर, पल्स हॉस्पिटल बरियातू आणि पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीनं छापे टाकले.

 

IAS अधिकारी पूजा सिंघल कोण आहेत :- 

पूजा सिंघलचा जन्म देहरादूनचा. देहरादूनच्या गढवाल विश्वविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. पूजाने पहिल्याच प्रयत्नात आयएएसची परीक्षा पास केली. शाळेपासून विश्वविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत पूजाचे नाव टॉपरच्या लिस्टमध्ये असायचे. आयएएस झाल्यानंतर तिने अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यामुळे ती चर्चेत राहिली.

Comments are closed.