Take a fresh look at your lifestyle.

कडक उन्हाळा! ‘अशी’ घ्याल आपल्या आरोग्याची काळजी

निसर्गनियमानुसार वातावरणात बदल होणं स्वाभाविक असतं, निसर्गाच्या नियमानुसार बदल होतच असतात ते आपल्या हातात नसतं. मात्र या बदलांना जुळवून घेणं आपल्या हातात असतं. उन्हाळ्याच्या काळात उष्णता वाढल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भवतात त्यातून डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. पण ऋतूमानानुसार आहारशैलीत बदल केल्यास आरोग्य चांगलं राहातं.

उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणातील उष्णता वाढते आणि त्याचा शरीरावर बदल होतो. डिहायड्रेशन, उष्माघात, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, अॅसिडिटी, डोकं दुखणं, अस्वस्थ वाटणं, थकवा जाणवणं या समस्या उद्भवतात.

एप्रिलमध्येच तापमान चाळीशी गाठतंय, तर पुढचे महिने कसे असतील याची काळजी सगळ्यांना लागलीय. म्हणून उन्हाळ्यात प्रत्येकानं आपापली काळजी कशी घ्यायची, याच्या काही खास टीप्स :-

  • गाड्यांवरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत
  • स्वच्छ पाणी प्यावं. ताक, लिंबू, सरबत प्यावं
  • साखर मीठाचं पाणी प्यावं, खाण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत
  • चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स, दारू पिऊ नका
  • उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करा
  • सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने चक्कर येते. त्यामुळे पाणी भरपूर प्यावे
  • मुगाची खिचडी किंवा वरण-भात तसेच सर्व पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढवावे
  • टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, काकडी, द्राक्षे आदी फळांचे सेवन वाढवावे

Comments are closed.