Take a fresh look at your lifestyle.

होमिओपॅथी ही कुठल्याही दुष्परिणामाशिवाय असाध्य रोग बरा करणारी उपचारपध्दती-डॉ. प्रवीण जोग

सेलू :-  येथील पेन्शनर्स असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ‘जाणून घेऊया होमिओपॅथी’ या विषयावर बोलताना डॉ. प्रवीण जोग म्हणाले, १७९० साली जर्मन डॉक्टर सामुएल हानेमान यांनी ‘काट्याने काटा काढणे’ या समचिकित्सा तत्वावर सुरू केलेली कुठल्याही दुष्परिणामाशिवाय अगदी असाध्य रोग ही बरा करणारी जगभर प्रचलित उपचार पद्धती आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विनायकराव कोठेकर होते. डॉ. जोग पुढे म्हणाले, होमिओपॅथीमध्ये रुग्णाचे व्यक्तिमत्व, आवडी निवडी, सवयी आणि त्याची मानसिकता विचारात घेऊन उपचार केले जातात. त्यामुळे एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना वेगळी औषधे दिली जाऊ शकतात.
यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.  या कार्यक्रमात पेन्शनर्स असोसिएशनचे सहसचिव श्री नारायण ईक्कर व सभासद श्री नागनाथ देशपांडे यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. या वेळी छोटी बालिका मृण्मयी ईक्कर हीने आपल्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या गोड शुभेच्छा, सभागृहात उत्स्फुर्तपणे कौतुकास्पद टाळ्या देऊन गेल्या .

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कोठेकर यांनी  डॉ.प्रवीण जोग यांच्या रूग्णसेवेबद्दल गौरवोद्गार काढून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र मुळावेकर यांनी, सूत्रसंचालन नागेश देशपांडे तर आभार के.पी.राठोड यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रघुनाथ देशमुख, बाबुराव धामणगावकर, शेख उस्मान, विनोद मोगल यांनी परिश्रम घेतले.

डाॅ विलास मोरे, सेलू 

Comments are closed.