Take a fresh look at your lifestyle.

अल्पवयीन मुलीचा हात पकडणे आणि प्रेम व्यक्त करणे म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे- POCSO कोर्टाचा धक्कादायक निर्णय

मुंबई: राजधानी मुंबईमध्ये एका खटल्याचा निर्णय देताना POCSO कोर्टाने एक महत्वपूर्ण निर्णय दिला. एखाद्या अल्पवयीन मुलीचा हात पकडणे किवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणे लैंगिक अत्याचार मानले जाणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने या प्रकरणात एका 28 वर्षीय युवकास निर्दोष मुक्त केले आहे. वर्ष 2017 मध्ये त्या युवकाने एका अल्पवयीन मुलीला प्रपोज केले होते.

प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल अफेंसेस एक्टला पॉक्सो म्हणतात. POCSO न्यायालय 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला/मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. 2012 मध्ये बनवण्यात आलेल्या या कायद्यांतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. 2018 मध्ये सरकारने या कायद्यात मोठे बदल केले.

कोर्टाने म्हटले की, आरोपीचा लैंगिक छळ करण्याचा कोणताही हेतू होता हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. निकाल सुनावताना कोर्टाने म्हटले की, आरोपींनी सतत तिचा पाठलाग केला, तिला एका निर्जन ठिकाणी नेले, हे सिद्ध करण्यासाठीसुद्धा कोणतेही भौतिक पुरावे नाहीत.

पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता

कोर्टाने म्हटले की, “आम्हाला असे आढळले की, आरोपी ने कथितरित्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याचा कोणताही पुरावा आणण्यास अभियोजन पक्ष अपयशी ठरला असून, पुरावा नसल्यामुळे आम्ही आरोपीला संशयाचा लाभ देत निर्दोष मुक्त करत आहोत.”

Comments are closed.