Take a fresh look at your lifestyle.

हिंदुस्थानी भाऊच्या नावाने व्हायरल झाली ऑडियो क्लिप…वकिलांच्या स्पष्टीकरणावर सर्वांची नजर..!

मित्रहो वृत्तपत्र, टीव्ही वरील बातम्या आज एकच नाव लोकांच्या समोर आणत आहेत, सोशल मीडियावर युट्युबर म्हणून प्रसिद्ध असणारे हिंदुस्थानी भाऊ यांना आता अटक करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. असा व्हिडीओ शेअर करून त्यांनी तरुण मंडळीना भडकवल्याच्या गुन्ह्याखाली त्यांना मंगळवारी सकाळी धारावी पोलिसांनी अटक केले होते. तीच भाऊला न्यायालयाने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सोशल मीडियावर अनेकजण याबाबत विशेष चर्चा रंगवत आहेत. अटक झालेल्या भाऊने आपल्या वकिलाची मदत घेतली असून त्याचे वकील ऍड. अशोक मुळे यांनी भेट घेतल्यानंतर सर्व हकीकत व्यवस्थित जाणून घेतली. त्यांनी याबाबत एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की “विद्यार्थ्यांसाठी भाऊंना अटक झाली, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे.

अशा परिस्थितीत आज दुपारी १२ वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करणारी एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे”. अशोक मुळे यांनी विद्यार्थ्यांना व्हिडीओ मार्फत ही माहिती पोहचवली आहे. या ऑडियो क्लिप मधून आपणाला कळून येते की आज दुपारी १२ वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी एकत्र जमा व्हायचे आहे. यामध्ये आपण भाऊंना साथ देत आहोत.

अशोक म्हणतात की आपण या आवाहनाला स्वीकारून एकत्र आलो पण हे आवाहन नसून आपण भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होतो. त्यांनी विद्यार्थ्यांना ठाण्याबाहेर जमा होण्याचं आवाहन केले न्हवते. आपण त्यांना साथ देण्यासाठी तिथे उभे होतो, अस अशोक मुळे यांनी आपला व्हिडीओ बनवून त्याद्वारे सांगितले. ते पुढे म्हणाले की “मी आताच हिंदुस्थानी भाऊला भेटलो. काही समाजविघातक लोक त्यांच्या नावाने विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हिंदुस्थानी भाऊ कडून चाहत्यांना विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले की ‘ मी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत माझा किंवा माझ्या वतीने दावा करत कोण्हीही व्हिडिओ शेअर केला तर आंदोलन करू नये. कोणी कुठेही एकत्र येऊ नये. काही लोक माझ्या नवाने परिस्थिती बिघडवण्याचा आणि पोलिसांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वतः बाहेर आल्यानंतर बोलेन.'” वकील अशोक यांनी अस ही व्हिडीओ द्वारे सांगितले.

Comments are closed.