Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा…गुंतवणूकदारांना मोठी संधी ‘ही’ कंपनी देत आहे 10 % पेक्षा जास्त व्याजदर, जाणून घ्या पूर्ण माहिती

आर्थिक: गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येकजण व्याज किती मिळणार हे प्रथमतः  पाहत असतो. कित्येक बँकानी मुदत ठेव आणि बचत खाते वरील व्याजदर कमी केलेत. खाजगी बँकेत व्याजदर जास्त असतात परंतु सुरक्षिततेची हमी नसते. त्यामुळे प्रत्येकजण ज्यादा व्याजदर कुठे  मिळेल ते शोधत असतो.  या लेखात चांगले व्याज दर देणार्‍य योजनेबाबत माहिती घेऊ.

आता ग्राहकांसाठी मुथूट मिनी कंपनीने नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर (NCD) लाँच केले आहेत. यामध्ये गुंतवणुकदारांना जवळपास 10.41 टक्के इतके व्याजदर मिळत आहे. इतका व्याजदर तुम्हाला बँक, पोस्ट कोठेही मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करण्याच्या विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय असेल.

असे आहेत मथुट मिनी कंपनीचे व्याजदर

सरकारी बँकेच्या तुलनेत खाजगी बँक जास्त व्याजदर देतात. परंतु तेथे पैसे सुरक्षित राहतील की नाही याची गुंतवणूकदाराला शाश्वती नसते. त्यामुळे तुम्ही चांगले व्याजदर आणि गुंतवणुकीची शास्वती कशी मिळेल या शोधात असाल तर मुथुट मिनी कंपनीच्या नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर (NCD) मध्ये गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे.

इथे तुम्हाला 10.41 टक्के इतके व्याज मिळत आहे. तर भारत एटीएम च्या ग्राहकांना 11 टक्के व्याज मिळणार आहे. 9 सप्टेंबर ही गुंतवणुकीची शेवटची तारीख असणार आहे. मुथुट ही आर्थिक विश्वातील एक विश्वासार्ह कंपनी आहे. या कंपनीत तुमच्या ठेवी सुरक्षित राहण्याची हमी इतर खाजगी संस्थांपेक्षा  जास्त आहे.

मुथूट मिनीच्या NCD वर वर्षाला 8.75 टक्के इतके व्याज मिळणार आहे. तुम्ही गुंतवणूक किती कालावधीसाठी करत आहात त्यानुसार व्याजदर बदलतील. तुम्ही दोन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 9 टक्के , 42 महिन्यांसाठी केली तर 9.50 टक्के आणि 50 महिन्यांसाठी गुंतवणूक केली तर 10.22 टक्के इतके व्याज मिळेल.

काय आहे NCD ?

NCD म्हणजे नॉन कन्व्हर्टिबेल डिबेंचर्स हा आर्थिक गुंतवणुकदारांसाठी एक चांगला पर्याय आहे. कंपनीकडून हे डिबेंचर्स इश्यू केले जातात. या माध्यमातून कंपनी निधी उभारते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एकाच दराने व्याज मिळते. मॅच्युरिटीच्यावेळी तुम्ही गुंतवलेली मुद्दल रक्कम परत मिळते. यामुळे जे चांगल्या व्याजदराच्या शोधात आहेत ते इथे गुंतवणूक करू शकतील.

टीप: गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतः सर्व बाबींची पडताळणी करूनच योग्य निर्णय घ्या. हा लेख फक्त माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या योजनेविषयी अधीक माहितीसाठी जवळच्या शाखेत जाऊन चौकशी करा.

Comments are closed.