Take a fresh look at your lifestyle.

विदर्भाला वातावरणाचा झटका; 10-12 एप्रिल दरम्यान घडणार ‘ही’ गोष्ट

नागपूर :

राज्यात सध्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ, खानदेश, सोलापूर, नांदेड, परभणीसह मुंबई परिसरात तसंच पणजीमध्येही गेल्या काही दिवसांपासून पारा नेहमीपेक्षा जास्त वर चढताना दिसतोय. महाराष्ट्रातील अनेक शहरात तापमान चाळीशीवर पोहोचलेल आहे. महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट आता राज्यभर पसरतेय. या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आलेल्या आहेत. अशातच हवामान विभागाने एक महत्वाची माहिती समोर आणली आहे.

हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 10-12 एप्रिल दरम्यान विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील तापमान देखील 40 अंशाच्या वर गेलं आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

भारतीय हवामान विभागाचे नवी दिल्ली येथील शास्त्रज्ञ आर के जेनमानी यांनी नवी दिल्लीतील तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याची माहिती दिली. 1 ते 2 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहिल. मध्य भारत आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट जाणवेल, असं जेनमानी यांनी म्हटलंय. 2 एप्रिल नंतर तापमान कमी होईल, असं त्यांनी म्हटलंय.

Comments are closed.