Take a fresh look at your lifestyle.

वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी द्या नसता जन आंदोलन उभारू माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा सरकारला इशारा

सेलू :- राज्य शासनाने परभणी येथे तात्काळ शासकीय वैद्यकिय महाविद्यालय उभे करावे या मागणीसाठी सेलू येथून स्वाक्ष-यांची मोहिम राबविण्याचा शूभारंभ होत आहे. याची दखल घेवून शासनाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी द्यावी नसता खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून अंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिला आहे. परभणी येथे शासकिय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे या मागणीसाठी सेलू येथील साई नाट्यगृह परिसरात आयोजीत स्वाक्षरी मोहीम शूभारंभ प्रसंगी शनिवार 21 आँगस्ट रोजी अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सूरवसे, राम पाटील, अशोक काकडे, कार्यक्रमाचे आयोजक रणजीत गजमल, संतोष कुलकर्णी, पंजाब डख, मंगल कथले, पवन आडळकर, संदिप लहाने, मनिष कदम, विनोद तरटे, रहिम पठाण, कूरेशी सर, रमेश डख, अशोक अंभोरे, साईराज बोराडे, छगन शेरे, पांडूरंग कावळे, नरेंद्र दिशागत, काशीनाथ घूमरे, अविनाश शेरे आदींची प्रमूख उपस्थिति होती. यावेळी बोलतांना माजी आमदार हरिभाऊ लहाने म्हणाले की, परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वासियांना संघर्षाची भूमिका घ्यावी लागते.

यात परभणी येथे कृषी विद्यापिठ स्थापन पासूनचा इतिहास तपासला असता कायम संघर्षच करावा लागला. दरम्यान सेलू तालूका मंजूर करणे तसेच लोअर दूधना प्रकल्पाची उभारणी करणे यासाठी देखील सेलूकरांनी मोठा संघर्ष उभा केला होता. यात तालुक्यातील नागरीकासोबतच पत्रकाराची भूमिका देखील मोलाची ठरली होती. आपली संघर्षाची भूमिका विकासासाठी महत्वाची असल्या कारणाने यावेळी देखील आपण सर्व मिळून संघर्ष करू. जेणे करून शासनाला परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करायला तात्काळ भाग पाडू.

कारण सध्याची करोना परिस्थिति लक्षात घेता जिल्ह्यातील अपू-या वैद्यकीय सूविधेवर मात करण्यासाठी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय हाच एकमेव पर्याय आहे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहिल्यानंतर जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे डाँक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येतील. तसेच गोरगरीब रुग्णासाठी उच्च दर्जाची वैद्यकीय उपचार पद्धती उपलब्ध होवून जिल्ह्यातील सर्व समान्यांना त्याचे आरोग्य अबाधीत राखता येईल. यासाठी पक्षीय राजकारण दूर ठेवून सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येवून या लढ्याची सूरूवात केली आहे. आज सेलू येथून सूरू झालेला लढा विविध प्रकारच्या अंदोलनाने शासकिय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होई पर्यंत सूरू राहिल.

अशी ग्वाही माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी दिली. यावेळी, विनोद बोराडे, संतोष कूलकर्णी, कूरेशी सर, रहिम पठाण, मिलिंद सावंत, अशोक अंभोरे, राम पाटील, अशोक काकडे, पंजाब डख, छगन शेरे यांनी मनोगत व्यक्त करून अभियानास पाठींबा दर्शविला. हवामान तज्ञ पंजाब डख यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रतिमा भेट देवून गौरव करण्यात आला. यावेळी तालुक्यातील ग्रामिण भागातील नागरीकांची मोठी उपस्थिति होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रणजित गजमल यांनी केले. सुत्रसंचलन मोहन बोराडे तर आभार मनिष कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समितीच्यावतिने पूढाकार घेण्यात आला.

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.