Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे…शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला कोविड टास्क फोर्सने केला विरोध, आता पुढे काय होईल जाणून घ्या

मुंबई: महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सरकारने यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) देखील आणले होते, परंतु महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाशी कोविड टास्क फोर्स सहमत नाही. अशा स्थितीत आता राज्य सरकार शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहे. राज्य मंत्रिमंडळात बुधवारी या विषयावर चर्चा झाली.

मुलांना लस मिळाली नसल्याने जोखीम घेणे टाळावे

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, “टास्क फोर्सच्या सदस्यांनी शाळा उघडण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. 18 वर्षांखालील मुलांचे अद्याप लसीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका असू शकतो. अशी त्यांना भीती आहे.  त्यांचे म्हणणे आहे की सध्या ही जोखीम घेणे टाळावी.”

राजेश टोपे पिढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी राज्य टास्क फोर्स आणि शालेय शिक्षण विभागासोबत बैठक घेणार आहेत. शाळांबाबत अंतिम निर्णय या बैठकीतच घेतला जाईल.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच एक बैठक बुधवारीच आयोजित करण्यात आली होती, परंतु त्या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती माहिती

मागील आठवड्यात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 5 वी ते 8 वी पर्यंतचे ऑफलाईन वर्ग ग्रामीण भागात आयोजित केले जाऊ शकतात, त्याचबरोबर, कोविड -19 प्रोटोकॉल पाळत शहरांमध्ये 8 वी ते 12 वी पर्यंत वर्ग आयोजित केले जाऊ शकतात, असे सांगितले होते.  मंगळवारी, SOP जारी करताना राज्य सरकारने म्हटले होते की, फक्त त्याच गावात आणि शहरात शाळा उघडण्यात येतील ज्या ठिकाणी मागच्या महिन्यापासून कोविडची प्रकरणे कमी आहेत.

सरकारने शाळा व्यवस्थापनालाही  बॅक टू स्कूल मोहीम सुरू करण्यास सांगितले आहे, जेणेकरून मुलांना कळेल की शाळा उघडणार आहे. वर्ग आयोजित करताना विद्याढ्यांची उपस्थिती अनिवार्य ठेवली जाऊ शकत नाही. असे एसओपीमध्ये म्हटले आहे. तसेच मुलांना शाळेत बोलवण्यासाठी शाळांनी त्यांच्या पालकांची परवानगी घेणे बंधनकारक असेल.

आता पुढे काय होईल?

कोविड टास्क फोर्सच्या विरोधानंतर सरकार शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक घेऊन यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका