Take a fresh look at your lifestyle.

Sarkari Naukri 2021: दिल्ली, महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये बंपर सरकारी नोकऱ्या, लवकर करा अर्ज

नवी दिल्ली: दिल्ली, महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकऱ्या निघाल्या आहेत. उमेदवार या पदांसाठी सबंधित विभागांच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे निर्धारित अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. कोणत्या सरकारी विभागात किती पदांची भरती झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे, जाणून घ्या.

GAIL पदभरती: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ने वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार या पदांसाठी GAIL च्या अधिकृत वेबसाइट www.gailonline.com द्वारे अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 220 रिक्त जागा भरल्या जातील. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्लीत केली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 7 जुलै 2021 पासून सुरू होणार असून, अंतिम तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

शैक्षणिक पात्रता: वरिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, वरिष्ठ अधिकारी (E & P) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पेट्रोलियम / मेकॅनिकल / केमिकल अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

माझगाव डॉक: माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, महाराष्ट्र (Mazagon Dock Ship Builders Limited) ने अप्रेंटिसच्या (MDL Recruitment 2021)  विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाईट mazagondock.in द्वारे अर्ज करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 425 रिक्त जागा भरल्या जातील. या पदांसाठी उमेदवार 10 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता: काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता 8 वी पास, काही 10 वी पास निश्चित केली आहे. तसेच, काही पदांसाठी, उमेदवाराकडे संबंधित स्ट्रिमची ITI पदविका असणे आवश्यक आहे.

OSSSC: ओडिशा सबऑर्डिनेट स्टाफ कमिशन (OSSSC) ने पशुधन निरीक्षक पदांच्या 565 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. 26 ऑगस्ट 2021 पर्यंत आयोगाच्या अधिकृत वेबसाइट osssc.gov.in द्वारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरू होईल.

टीप: उमेदवारांनी संबंधित वेबसाइटवरील नोटीफिकेशन स्वतः वाचून पुढील प्रक्रिया करावी. विभागांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेली अधिसूचना वाचल्यानंतरच उमेदवारांनी अर्ज करावा. नियमांनुसार केलेला अर्ज वैध असेल. अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.