Take a fresh look at your lifestyle.

अरे व्वा! नोकरी करणार्‍यांसाठी मोठी खुशखबर, ऐकून विश्वास बसणार नाही

नवी दिल्ली:  देशातील नोकरदार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच त्यांना एक चांगली बातमी मिळू शकते. देशातील नोकरी करणार्‍या लोकांची कामकाजाची वयोमर्यादा वाढवली पाहिजे, असे  पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने (EAC) असे सुचवले आहे. निवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टीमही सुरू करावी अशी सूचना समितीने केली आहे.

दरमहा किमान 2000 रुपये देण्याची सूचना

आर्थिक सल्लागार समितीनुसार, या सूचना अंतर्गत दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन म्हणून दिले पाहिजे. तसेच आर्थिक सल्लागार समितीने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे.

32 कोटी ज्येष्ठ नागरिक होतील

जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे 32 कोटी होणार असल्याचा अंदाज आहे. हे देशाच्या लोकसंख्येच्या 19.5 टक्के असेल. 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजे जवळपास 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

कौशल्य विकासावर भर

केंद्र आणि राज्य सरकारने अशी धोरणे आखली पाहिजेत, जी कौशल्य विकासावर अधिक भर देऊ शकतील. या प्रयत्नात असंघटित क्षेत्र, दुर्गम भागात राहणाऱ्या सर्व लोकांचा समावेश करण्यात यावा. असा सल्ला या अहवालात देण्यात आला आहे.

सरकार लवकरच या विषयावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments are closed.