Take a fresh look at your lifestyle.

नगरच्या खाद्यसंस्कृती मध्ये गावरान मेवा मिसळ ची एन्ट्री !

नगर :- अहमदनगर जिल्हा हा खाद्यपदार्थ आणि येथील खाद्य संस्कृती साठी ओळखला जातो.त्यात मिसळ म्हंटलं की नगरकरांच्या तोंडाला पाणी सुटलंच म्हणा…!यातच आता गावरान मेवा या मिसळ ने धडाकेबाज एन्ट्री केली आहे. सध्या महाराष्ट्र आणि परदेशात ही मराठी माणसांची मनोरंजनाची भूक भागवणाऱ्या गावरान मेवा या वेबसेरीज चे लेखक किरण बेरड यांनी त्यांच्या ‘गावाकडच्या मसाल्यापासून बनवलेली गावरान मेवा मिसळीच्या फ्रॅंच्याइजि देण्यास सुरुवात केली आहे.

या मिसळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मिसळ पूर्णतः पारंपरिक पद्धतीने केमिकल विना बनवली जाते.त्यामुळे ही खाल्ल्याने जळजळ, पित्त होत नाही.तसेच गावरान मटकी वापरल्यामुळे मिसळीची खरी चव कळते.या मिसळ बरोबर गावरान तुपातील एक स्वीट पदार्थ मिळतो. तसेच सोबत नाचणी पापड असल्याने कॅल्शियम आणि प्रथिने ही शरीरास मिळतात.अशी ही टेस्ट आणि हेल्थ चा अनोखा संगम असणारी गावरान मेवा मिसळ मेहेकरी फाट्यावर सुरू झाली आहे.

हॉटेल मालक अशोक दिनकरराव वायभासे यांनी याची पहिली फ्रॅंच्याइजि घेतली आहे.आज या शाखेचे दिमाखात उद्घाटन झाले. यावेळी आम्ही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक पाठबळ देण्यासाठी गावरान मेवा या मिसळ ची निर्मिती झाली आहे.या उद्घाटन समारंभात नेते संदीपजी गुंड , मेहेकरी चे सरपंच संतोष पालवे, गावरान मेवाचे किरण बेरड ,लेखक सचिन पंडित, कलाकार महेश काळे,वैभव कुऱ्हाडे, तेजस आंधळे , राजू काळे , मिलिंद फुंदे ,रियाझ शेख, सॅम चव्हाण इ उपस्थित होते. फ्रॅंच्याइजि पार्टनर अशोक वायभासे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Comments are closed.