Take a fresh look at your lifestyle.

हास्यजत्रेतील तुमचा लाडका चेहरा ‘या’ सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीसोबत झळकणार…

टेलिव्हिजन क्षेत्रात खूप साऱ्या मालिका नवीन पद्धतीने प्रेक्षकांनच्या समोर प्रेजेंट करून त्याचा नावलौकिक करण्याची एक नविन पद्धत आहे. पण अश्या खुपश्या मालिका आहेत ज्या काही दिवसानंतर सर्वांचा निरोप घेतात त्याच्या आल्याचा गेल्याचा कोणाला काहीच पत्ता लागत नाही. परंतु महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.

या शोमधील सर्वच कलाकार अगदी बेफान होऊन प्रेक्षकांना हसवत असतात. या शोमध्ये ज्याच्यावर सर्वात जास्त जोक्स होतात ज्याची खिल्ली उडवली जाते असा गौरव मोरे याचा अभिनय खूप लोकांना आवडत असतो. हास्यजत्रेतील कलाकार वेळोवेळी स्वतःला अजमावून पाहत असतात. हास्यजत्रेमध्ये छोट्या पडद्यावर सर्वाना हसवणारा गौरव मोठ्या पडद्यावर देखील हसवण्यासाठी सज्ज झाला आहे.

लवकरच महाराष्ट्राची हास्यजत्रा यातील अभिनेता गौरव मोरे हवाहवाई या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ‘द ग्रेट इंडियन किचन’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली मल्याळम अभिनेत्री निमिषा संजयनसोबत तो झळकणार आहे.

या चित्रपटातद्वारे निमिषा मराठी सिनेसृष्टीत प्रदार्पण करणार आहे. हा चित्रपट तुम्हाला येणाऱ्या १ एप्रिल २०२२ रोजी जवळच्या नाट्यगृहात पाहता येईल. द ग्रेट इंडियन किचन यातील निमिषाचा अभिनय पाहून मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तिला मराठी चित्रपटात काम करण्याविषयी विचारणा केली होती.

यावर निमिषाने होकार देखील कळवला होता. आजपर्यंत अक्षय कुमार, जया प्रदा, हेलन यांसारख्या मोठ्या कलाकारांनी महेश टिळेकर यांच्या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रदार्पण केले आहे. हवाहवाई या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आशा भोसले यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी या चित्रपटातील एका गाण्याला स्वतःचा आवाज दिला आहे.

तर महाराष्ट्राची हास्यजत्राद्वारे आपल्या कॉमेडीची छाप सोडणारा गौरव मोरे चित्रपटात छाप सोडण्यास सक्षम ठरेल. त्याच्यासाठी सगळे आतुरता लावून बसले आहेत. गौरव मोरे यांनी आजपर्यंत संजू, बाळकडू, विकी विलींगकर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केली आहेत. तर तुम्हाला गौरव मोरे यांचा अभिनय कसा वाटतो..?आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.

Comments are closed.