Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्यम! भारत आणि तालिबान दरम्यान ‘या’ मुद्द्यांवर झाली औपचारिक चर्चा, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

दोहा: तालिबानने अफगाणिस्तान वर कब्जा मिळवल्यानंतर भारताचे आणि अफगाणिस्तानचे आंतराराष्ट्रीय संबंध कसे राहतील याबाबत सर्व भारतीयांना कुतूहल होते. भारत बरेच ड्राय फ्रुट्स अफगाणिस्तान मधून आयात करतो. तालिबान्यांनी अफगाणिस्तान जिंकल्यानंतर भारतात ड्राय फ्रूट्सच्या किंमती मध्ये वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान कोणतीही चर्चा झाली नव्हती.

भारतीय राजदूतांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद स्टेनकझाई यांची घेतली भेट 

दरम्यान, कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझाई यांची दोहा येथे भेट घेतली. या भेटी दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता आणि भारतात परतण्याबाबत चर्चा झाली. यासोबतच तालिबानने अफगाणिस्तानची माती भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याबाबत भारताने चिंता व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे तालिबानने भारताशी संबंधित सर्व समस्या सकारात्मक पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन दिले.

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांविषयी झाली चर्चा 

परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी (31 ऑगस्ट) निवेदन जारी करत या बैठकीची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनिकझाई यांची भेट घेतली. या चर्चा अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेवर केंद्रित होत्या.

दहशतवादावरही झाली चर्चा 

“राजदूत दीपक मित्तल अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही प्रकारे भारतविरोधी कारवाया आणि दहशतवादासाठी वापरली जाऊ नये, याबद्दल यांनी चिंता व्यक्त केली. तालिबानच्या प्रतिनिधीने भारतीय राजदूताला हे मुद्दे सकारात्मकपणे सोडवले जातील, असे आश्वासन दिले की” अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून घेतली माघार

अफगाणिस्तानातून आपले सर्व सैन्य मागे घेतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी अमेरिकेने युद्धग्रस्त देशातील सर्वात प्रदीर्घ युद्ध संपवले असल्याची घोषणा केली. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने पूर्ण माघार घेतल्यानंतर तालिबानने काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पूर्णपणे ताबा घेतला आहे. अमेरिकेच्या सैन्याला घेऊन जाणारे शेवटचे विमान नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर सोमवारी मध्यरात्री अफगाणिस्तानला निघाले. अशा प्रकारे 20 वर्षे चाललेले युद्ध संपले.

अफगाणिस्तानातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती पूर्णपणे संपवल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तालिबान लढाऊंनी काबुलमध्ये हवेत गोळीबार केला.

Comments are closed.