Take a fresh look at your lifestyle.

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणार असाल तर वाचा ही महत्वाची बातमी, सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

नवी दिल्ली: जगभरात बिटकॉईन इत्यादि क्रिप्टो चलनाची अब्जावधी डॉलर्सची उलाढाल आहे. भारतातही क्रिप्टोकरन्सी विषयी जागरूकता वाढली आहे आणि बरेच जन क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत.

निर्मला सीतारमण यांनी सरकारची भूमिका केली स्पष्ट

क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी समोर येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतात लवकरच क्रिप्टोकरन्सीच्या नियन आणि मार्गदर्शक तत्वांचे लवकरच काम लवकरच पूर्ण होईल. तसेच सरकारची भूमिका क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. क्रिप्टोकरन्सी हे एक प्रचंड क्षमता असलेले क्षेत्र आहे, ज्यामुळे जगभरात बरेच बदल होत आहेत. असेही त्यांनी सांगितले.

‘क्रिप्टोकरन्सीला आमचा विरोध नाही

निर्मला सीतारमण ईटीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या की, “आम्ही याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आम्ही क्रिप्टोकरन्सीला नकार देत नसून, फिनटेक क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान कसे मदत करू शकते हे आम्हाला पाहावे लागेल. ”

आरबीआय सोबत करावे लागणार काम

क्रिप्टोकरन्सी संदर्भात नियमन तयार करण्यासाठी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) सोबत काम करणार असून, सध्या क्रिप्टोकरन्सीशी संबंधित नियमन अंतिम टप्प्यात आहेत आणि केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर निर्णय घेणार आहे.

एअर इंडिया आणि बीपीसीएलचे खाजगीकरण या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल

मुलाखती दरम्यान त्यांनी एअर इंडिया आणि बीपीसीएलच्या खाजगीकरणाबाबतही माहिती दिली. ही प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जेव्हा सरकार एखाद्या कंपनीची मालकी सोडून देते, तेव्हा त्यासाठी अधिक योग्य काळजी घेणे आवश्यक असते. एलआयसीच्या सार्वजनिक ऑफरवर, त्याने सांगितले की यात कोणतीही अडचण नाही आणि त्यात विकल्या जाणाऱ्या भागभांडवलाची माहिती नंतर दिली जाईल. असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

Comments are closed.