Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारने पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींचं पॅकेज केलं जाहीर, जाणून घ्या नियम व अटी

मुंबई: कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतीवृष्टीमूळे आलेल्या पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत आणि दीर्घकालीन मदतीकरिता उद्धव ठाकरे सरकारने तब्बल 11 हजार 500 कोटीची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडली. या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने झालेल्या नुकसानीबाबत सादरीकरण केले. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्ये झालेल्या पुराचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानाचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. ते पाहून मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा प्रकारे असेल मदत..

पुरामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे पूर्णतः उद्वस्थ झाली आहेत. ज्यांचे पूर्ण घर पडले आहे त्यांना सरकारकडून दीड लाखांची मदत करण्यात येणार आहे. तसेच दुकानदारांना 50 हजार रुपये आणि टपरी वाल्यांना  10 हजार रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली

Comments are closed.