Take a fresh look at your lifestyle.

पुर ओसरला आणि समोर आली भिषण वास्तवता…

नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नगर आणि इतर तालुक्यात दोन दिवसापुर्वी झालेल्या पावसामुळे जोरदार पुर आला. या पुरामुळे मोठे नुकसान झाले. पुर ओसरल्यानंतर या पुराची भिषण वास्तवता समोर आली आहे. दोन्ही तालुक्यात मिळून सुमारे सातशे ते साडेसातशे पेक्षा अधिक कुटूंबाला हानी पोचली आहे. आडीचशे पेक्षा अधिक जनावरांचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. शेतपीकांसह अन्य बाबीचे मोठे नुकसान झालेय.

दोन दिवसापुर्वी झालेल्या जोरदार पावसाने शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्याला मोठा फटका बसला. दोन तालुक्यातील सर्वच महसुल मंडळात नेहमीच्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक पाऊस झाला. राहुरी, नेवाशातही नुकसान झाले. प्राथमिक अहवालानुसार नगर तालुक्यात पावसामुळे देवगांव, रतडगाय, पोखर्डी, जेऊर, डोंगरगण या पाच गावात सात घराचे नुकसान झाले. नेवासा तालुक्यात पावसामुळे घोडेगांव, शिरसगाव, सोनई (धनगरवाडी) या तीन गावात 3 घरांची अंशतः पडझड झाली.

राहूरी तालुक्यात पावसामुळे देसवंडी. राहुरी खु. येथे एकुण दोन घराची पडझड झाली. शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रुक, भगुर, वडुले बुद्रुक, लांडे व कराड वस्ती, भागात तब्बल सहाशे पेक्षा अधिक कुटूंबाला फटका बसला. आखेगाव, वरुर, भगुर व अन्य गावांत पुराचे पाणी शिरले. पाणी घरात शिरल्याने लोकांना घरावरील छतावर बसुन रहावे लागले. त्या लोकांना बाहेर काढून त्यांचे स्थलांतर केले.

गोठ्यात, पाणी शिरल्याने जनावरांना वाचवता आले नाही. त्यामुळे काही जानवरे वाहून गेली. विविध संस्था, समाजीक कार्यकर्ते यांनी लोकांच्या जेवनाची सोय केली आणि त्यांना आसरा दिला. आता हे लोक घराकडे आल्यावर झालेली भिषणता पाहून त्यांना रडू कोसळत आहे. नदीकाठची शेतपीके वाहून केली. हे सारे पाहून नुकसानग्रस्त नागरिक हतबल झाले आहेत.

शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यात पुरामुळे तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानाची खासदार डाॅ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अॅड्, शिवाजीराव काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे, जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, तहसीलदार आर्चना भाकड यांनी शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील नेत्यांनी पाहणी करत लोकांना धीर दिला. काकडे यांनी स्थलांतरीत लोकांच्या जेवनाची व अन्य सोय केली. सरकारी पातळीवर पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे अश्वासन दिले.
——

Comments are closed.