Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे… लशीचे दोन डोस घेऊनही कोरोनाच्या ‘या’ प्रकारामुळे महिलेचा झाला मृत्यू, ऐकून धक्का बसेल

मुंबई: कोरोना विषाणू धोकादायक असण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे त्याची उत्परिवर्तन  (Corona Virus Mutation) करण्याची क्षमता. कोरोना विषाणू सतत उत्परिवर्तन करत असतो. त्यातील काही उत्परिवर्तन हे फार घातक असतात. कोरोनाच्या डेल्टा प्रकारानेही उत्परिवर्तन केले असून त्यास डेल्टा प्लस हे नाव देण्यात आले आहे. डेल्टा प्लस हे डेल्टा पेक्षा अत्यंत घातक आणि संसर्गजन्य असल्याचे तज्ञांचे मत आहे. तसेच देशात संभावित कोरोनाची तिसरी लाट याच डेल्टा प्लस प्रकारामुळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू

दरम्यान, मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डेल्टा प्लस मुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असून, घाटकोपर मधील एका 63 वर्षीय महिलेचा जुलै महिन्यात मृत्यू झाला होता. अहवालानुसार महिलेचा मृत्यू डेल्टा प्लसमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तरीही डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे महिलेचा मृत्यू झाला. यामुळे डेल्टा प्लस प्रकारावर लस प्रभावी आहे की नाही याबाबत सामान्य जनतेच्या मनात शंका येत आहे.

राज्यातील दूसरा मृत्यू

महाराष्ट्रात डेल्टा प्लस प्रकारामुळे आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत. 13 जून रोजी 80 वर्षीय महिलेचा रत्नागिरीत पहिला मृत्यू झाला. 11 ऑगस्ट रोजी हे निष्पन्न झाले की महिलेचा मृत्यू डेल्टा प्लस प्रकारामुळे झाला होता.

जीनोम सिक्वेंसींग टेस्टद्वारे समोर आली माहिती

राज्य सरकारच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) सांगण्यात आले की जीनोम सिक्वेंसींग टेस्टमध्ये मुंबईतील 7 लोकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले आहे. यानंतर बीएमसीने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांशी बोलणे सुरू केले. ही महिलाही त्या सात लोकांमध्ये होती.

संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा प्लसची लागण

जेव्हा बीएमसीचे अधिकारी महिलेच्या कुटुंबीयांना भेटले, तेव्हा 27 जुलै रोजी महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन लोकांमध्ये डेल्टा प्लस प्रकार आढळून आल्याचे वृत्त आहे. मुंबई आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, डेल्टा प्लस प्रकारामुळे 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या इतर 6 लोकांचीही चौकशी करण्यात आली. तपासात 6 पैकी 2 लोकांमध्ये डेल्टा प्लस प्रकार आढळून आले आहेत. आता आणखी काही लोकांच्या तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.

Comments are closed.