Take a fresh look at your lifestyle.

माजीमंत्री बबनरावपाचपुते म्हणाले, हक्कभंग दाखल करणार

नगर, : श्रीगोंदे शहरातील ग्रामिण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लांटचे उदघाटन केल्यानंतर तेथील कोनशिलेवर उपस्थितीत नसणाऱ्या मंत्र्यांचे नावे वरच्या बाजूला आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे नाव खाली टाकल्याने चांगलाच गोंधळ झाला. विशेष म्हणजे हा प्लांट पाचपुते यांच्या विकासनिधीतून असतानाही हा दुजाभाव झाल्याने संतापलेल्या पाचपुते यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या अधिकाऱ्यांविरुध्द विधानसभेत हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज ग्रामिण रुग्णालयातील प्राणवायू निर्मिती सयंत्राचे उदघाटन झाले. त्यासाठी आमदार पाचपुते यांनी निधी दिला आहे. मात्र सदर कार्यक्रमाच्या कोनशिलेवर पाचपुते यांचे नाव खालच्या बाजूला टाकले गेले आहे. जिल्ह्यातील एकही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत नव्हता मात्र कोनशिलेवर त्यांचे नावे वरच्या बाजूला घेण्यात आल्याने पाचपुते चांगलेच वैतागले.

तेथे उपस्थितीत असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. चाळीस वर्षे झाले राजकारण करतोय सात वेळा आमदार राहिलो आणि अशा पध्दतीने आम्हाला वागणूक देता का 0 माझ्या निधीतून काम केले आणि जे उपस्थितीत नाहीत त्यांची नावे वरच्या बाजूला आणि माझे खाली टाकले हा प्रोटोकाॅल आहे का असा सवाल केला.

पालकमंत्री मुश्रीफ पाचपुते यांना समजावून सांगत होते मात्र यात तुमचा दोष नाही अधिकाऱ्यांना हे समजत नाही का हे त्यांचे काम आहे असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी तेथे उपस्थितीत अधिकाऱ्यांनी पत्रिका ज्या पध्दतीने आली त्याच पध्दतीने आम्ही नावे टाकली आहेत. कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव वरच्या बाजूला आहे मात्र कोनशिला तयार केली त्यावर खालच्या बाजूला कले गेले हे माहिती नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पाचपुते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

Comments are closed.