सेलू (डाॅ विलास मोरे) :- अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होऊन संपूर्ण पिके वाया गेली. शेतीसाठी घेतलेले कर्ज आता कसे फेडावे या विवंचनेने हाताश होऊन सोमवारी ता. ११ ऑक्टोबर रोजी सेलू येथे एका शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महेंद्र शंकर नाईक [वय ३८] रा. पोहनेर ता. परळी जिल्हा बीड असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, मयत शेतकरी महेंद्र शंकर नाईक हे पोहनेर ता. परळी जिल्हा बीड येथील रहिवासी होते. तेथे त्यांची १५ एक्कर शेती आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतीचे नुकसान होऊन शेतातील पिके नाहीशी झाली. संपूर्ण शेतीच नापिकी झाल्याने बँकेचे घेतलेले कर्ज फेडून संसाराचा गाडा कसा चालवायचा या विवंचनेने ते हतबल झाले होते.
त्यातच ते कुठेतरी मन रमेल म्हणून ते चार दिवसापूर्वी सेलू येथील मामा गंगाधर कान्हेकर यांच्याकडे येऊन राहिले होते. याच ठिकाणी सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या आढूला साडी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सेलू उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर सेलू येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले….
Comments are closed.