Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी ! कांद्याच्या दरात होऊ लागली वाढ

अहमदनगर/नाशिक : साधारण गेल्या सहा महिन्यापासून स्थिर असलेल्या गावराण कांद्याच्या दरात आता वाढ होऊ लागली आहे आज अहमदनगर येथील बाजार समितीत 2800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल कांद्याला दर मिळाला. मागील आठवड्यात हा दर साधारण 2200 रुपयांपर्यंत होता. नुकत्याच हाती आलेल्या खरिपाच्या कांद्यालाही 1800 रुपयापर्यंत क्विंटलला दर मिळत आहे. अनेक महिन्यानंतर पहिल्यांदाच कांद्याचे दर वाढू लागल्याने शेतकऱ्यात उत्साह निर्माण झाले आहे.

अहमदनगर, नाशिक, मराठवाडा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात गावराण कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या साधारण सात ते आठ महिन्यापासून कांद्याच्या दरात वाढ होत नव्हती. प्रतिक्विंटल साधारण 1800 ते 2000 रुपये यावर दर स्थिर होता. मागील आठवड्यात उलट दोनशे ते तीनशे रुपयाने कांद्याचे दर खाली आले होते.

आता मात्र दोन दिवसापासून कांद्याच्या दरात चांगली वाढ होऊ लागली आहे. 5-6 दिवसापूर्वी च्या लिलावात 2200 रुपये असलेला कांद्याला गुरुवारी एक नंबरच्या कांद्याला 2350 ते 2800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे. खरिपात ही कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती परंतु अतिवृष्टी पूर व सततच्या पावसाने खरीपातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता काही भागातील खरिपातील कांदा बाजारात येऊ लागला असून नगरमध्ये खरिपातील लाल कांद्याला 1800 रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीत दहा किलो कांद्याला 250 ते तीनशे रुपयांचा दर मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथे 3111 रुपयापर्यंत दर मिळाला आहे. अनेक महिन्यानंतर कांद्याचे दर वाढू लागल्यामुळे शेतकर्‍यात उत्साह,निर्माण झाला आहे. सध्याच्या बाजाराची परिस्थिती पाहता लाल कांद्याला ही चांगला दर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.