Take a fresh look at your lifestyle.

गरीबांना खिचडी वाटप करून सेलूत ईद साजरी..

सेलू (डाॅ विलास मोरे) : येथील आठवडी बाजार येथे मंगळवारी ता. १९ ऑक्टोबर रोजी शहरातून जुलूस न काढता गोरगरिबांना खिचडीचे वाटप करून मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त ईद-ए-मिलाद (ईद) हा उत्सव साजरा करण्यात आला.

ईद-ए-मिलाद (ईद) हा सन म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून साजरा केल्या जातो. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन दरवर्षी शहरातून जुलूस काढत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून देलेल्या निर्बंधाचे पालन करत सय्यद मुकित कादरी यांच्या नेतृत्वाखाली शहरात मिरवणूक (जुलूस) न काढता आठवडी बाजार सेलू येथे गोरगरिबांना खिचडीचे वाटप करण्यात आले. दरम्यान मौलाना फैमोदीन यांनी मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मा विषयी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अमर केंद्रे, पोलीस नायक श्रीहरी मुंडे, सुधाकर चौरे, संजय सानप, ग्यानदेव बेंबडे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Comments are closed.