Take a fresh look at your lifestyle.

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, आता ED ने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा अडचणी कमी होताना दिसत नसून, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरुद्ध  पुन्हा एकदा समन्स जारी केले आहे. ईडी तपास यंत्रणेने महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ED ने देशमुख यांना यापूर्वी सुद्धा चार वेळा समन्स जारी केले.

प्रकृतीचे कारण देत ईडी समोर हजार राहणे टाळले

अनिल देशमुख यांना ईडीने याआधी चार वेळा समन जारी केले होते आणि त्यांना चौकशीसाठी मुंबई कार्यालयात बोलावले होते, परंतु प्रत्येक वेळी त्यांनी प्रकृती खराब असल्याचा हवाला देत ईडी पुढे ते हजर झाले नाहीत. तसेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने ईडी पुढे हजर राहता येणार नाही असे कारण त्यांनी दिले होते. मात्र, आता अनिल देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही, त्यामुळे ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना पाचवा समन्स जारी केला आहे आणि त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडी ने जारी केला 5 वा समन्स

देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात त्यांना दिलासा द्यावा आणि अटकेला स्थगिती द्यावी, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाही. देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ईडीचा समन्स प्राप्त झाला आहे आणि त्यांना बुधवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11:00 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

अनिल देशमुख कुठे आहेत हे ईडी ल माहीत नाही

अनिल देशमुख सध्या कुठे आहेत याची ईडीला माहिती नसल्याचे ईडीने स्पष्ट केले. तथापि, देशमुख यांचे वकील दावा करत आहेत की ते सध्या दिल्लीत आहे आणि तसेच ईडीसमोर हजर व्हायचे की नाही याचा निर्णय देशमुख घेतील.

Comments are closed.