सध्या आंब्याचा सिजन आहे. पण लॉकडाऊन असल्याने आंबा खायला भेटत नाही. आता आंबा म्हटलं की अनेक जणांच्या तोंडाला पाणी सुटले असेल. मस्तपैकी पिकलेला आंबा खायला जितका चांगला तितकाच न पिकलेला म्हणजे कैरी हिरवीगार खायला चांगली आणि आरोग्यदायी… खरं तर कैरी ही आंबट असते पण तिचे जे औषधी गुण आहेत ते जास्त आहेत.
आज जाणून घेऊया कैरी खाण्याचे फायदे :-
- उन्हाळ्यात आपल्याला अनेक छोटमोठे आजार जडतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पण त्याला सगळ्यात चांगला उपाय म्हणजे कैरी खाणे.
- कारण कैरीमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असते. तसेच अँटी अक्सिडेंट चे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मोठी मदत होते. शिवाय उन्हाळी आजार बरे होतात.
- पित्त स्रावाचे नियंत्रण करण्यासाठी कैरी महत्वाची आहे.
- लिव्हरचे काम व्यवस्थित चालते.
- तोंडाचे विकार नष्ट होतात – जसे की दुर्गंधी, हिरड्यांचे त्रास, दात किडणे.
- चेहर्यावरील तेलकटपणा कमी करणे, पिंपल्स कमी करणे
- कैरीचे सेवन केल्यास फ्रेश वाटते. मेंदू ताजातवाना होऊन काम करतो.
Comments are closed.