Take a fresh look at your lifestyle.

तुमच्याजवळ 1 लाख रुपये असतील तर सुरू करा ‘हा’ व्यवसाय; होईल प्रत्येक वर्षी लाखोंची कमाई, मिळू शकते कर्ज

Business Ideas: जर तुम्ही चांगली कमाई करून देणारा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे कमी भांडवल असेल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. जर तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये असतील, तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता ज्यामध्ये कधीही मागणीची कमतरता नसते. हा केक बनवण्याचा व्यवसाय (Cake Making Business) आहे. केक मेकिंग बिझनेस हा पैसा कमावण्याचा एक चांगला मार्ग असून, हा व्यवसाय खेड्यात आणि शहरात दोन्ही ठिकाणी सहज सुरु करता येतो, स्त्रियासुद्धा घरी बसून चांगले पैसे कमवू शकतात.

अशा प्रकारे सुरू करा केक बनवण्याचा व्यवसाय

तसे पाहिले तर आपण हा व्यवसाय घरातून देखील सुरू करू शकता. किंवा तुम्ही भाड्याने दुकान देखील घेऊ शकता. जर तुम्हाला स्वतः केक कसा बनवायचा हे माहित असेल तर तुम्हाला कोणत्याही मदतीची आवश्यकता नाही.

प्रोफेशनल सेट-अप साठी जवळपास 1 लाख रुपये खर्च करावे लागतील

केक मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी काही आवश्यक वस्तू, मशीन आणि उपकरणे घ्यावी लागतील. यामध्ये एकूण एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

तुम्ही सरकारकडून कर्जही घेऊ शकता

सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला या व्यवसायासाठी सहज कर्ज मिळेल. बिस्किटे, केक, चिप्स किंवा ब्रेड उत्पादन युनिट सुरू करण्यासाठी, प्लांट, कमी क्षमतेची यंत्रसामग्री आणि कच्चा माल उभारण्यासाठी थोडी फार गुंतवणूक करावी लागेल.

केक बनवण्याच्या व्यवसायात आवश्यक कच्चा माल

केक बनवण्यासाठी पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, यीस्ट, अंडी, साखर, अनसाल्टेड बटर, दूध, खाद्य तेल, दालचिनी, व्हॅनिला अर्क, विविध प्रकारचे चॉकलेट आणि कोको पावडर लागेल.

अशा प्रकारे आपण करू शकता विक्री

बनवलेले केक आपण ऑफलाइन, ऑनलाईन, होम डिलिव्हरीचा पर्याय गूगलवर वेबसाईट आणि अॅप तयार करून किवा घाऊक विक्रेत्याशी संपर्क करून विकू शकता.

Comments are closed.

error: कृपया पोस्ट कॉपी करू नका