Take a fresh look at your lifestyle.

धुळीच्या एलर्जीने त्रस्त असाल तर वापरा या सोप्या पद्धती, एलर्जीची समस्या होईल कायमची दूर

आरोग्य: जंगलतोडीचे वाढलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, वाढती वाहन संख्या आणि कारखाने इत्यादि मुळे वातावरणात धुळीचे प्रमाण खूप वाढले आहे. बर्‍याच लोकांना धुळीची एलर्जी असते. धुळीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना सर्दी आणि शिंका यायला सुरू होतात. तसेच बर्‍याच जणांना दमा आणि इतर श्वसनाच्या समस्या उद्भवतात.

आता तुम्ही विचार करत असाल की धुळीची एलर्जी नेमकी कशी होते? एलर्जी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धुळीत असलेले कण, ज्यांना डस्टमाइट (Dust Mites) असे म्हणतात. या कणांमध्ये अनेक सूक्ष्मजीव (Micro Organisms) असतात जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. यासह, हवेमध्ये असलेले परागकण, प्राण्यांचे केस, बुरशी आणि अनेक प्रकारचे जीवाणू देखील एलर्जी निर्माण करतात.

आज या लेखात आपण धुळीच्या एलर्जीची समस्या दूर करण्याबाबतच्या पद्धतींची माहिती घेऊ:-

सफरचंद व्हिनेगर (Apple Vinegar)

धुळीच्या एलर्जीपासून मुक्त होण्यासाठी आपण सफरचंद सायडर व्हिनेगरची मदत घेऊ शकता. यासाठी दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर एका ग्लास कोमट पाण्यात मिसळून प्या. आपण चवीसाठी मधाचे काही थेंब मिसळू शकता. सफरचंद सायडर व्हिनेगरमध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.

मध

एलर्जी दूर करण्यासाठी तुम्ही मधाची देखील मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही दररोज थेट मध्यचे दोन चमचे सेवन करा. एक कप पाण्यात मध मिसळून देखील वापरता येते. मधात दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म देखील असतात. जे एलर्जीची समस्या दूर करण्यास उपयुक्त आहेत.

हळद

धुळीची एलर्जी दूर करण्यासाठी हळद सुद्धा फार उपयुक्त आहे. यासाठी एक कप दुधात थोडी हळद मिसळून एका पातेल्यात हे दूध उकळून घ्यावे. त्यानंतर दूध थंड करून त्यत थोडीशी काळ्या मिर्‍याची पूड आणि एक चमचा मध टाकून हे व्यवस्थित मिसळून घ्यावे. यानंतर त्याचे सेवन करावे. हळदी मध्ये सुद्धा दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे एलर्जी कमी करण्यास मदत करतात.

तळटीप: या लेखात दिलेली माहिती आणि सामान्य गृहितकांवर आधारित आहे. आम्ही गोष्टींची पुष्टी करत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी, कृपया संबंधित तज्ञाशी संपर्क साधा.

Comments are closed.