Take a fresh look at your lifestyle.

ड्रग्सच्या व्यसनापायी वडीलाने अडीच वर्षांच्या मुलासोबत केले धक्कादायक कृत्य, ऐकून थक्क व्हाल

माणूस व्यसनासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, या म्हणीला खरी ठरवणारी घटना नुक्तची आसाम राज्यात घडली आहे. आसाम येथील एका गावातील व्यक्तीने ड्रग्सचे व्यसन पूर्ण करण्यासाठी आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकले. त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला आणि मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

हे धक्कादायक प्रकरण आसामच्या गुवाहाटीपासून 80 किमी अंतरावर असलेल्या लहरीघाट गावात घडले. गावातील रहिवासी अमीमुल इस्लामने आपले अडीच वर्षांचे मूल साजिदा बेगम नावाच्या महिलेला विकले. मुलाची आई रुक्मिना बेगम यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

पतीच्या ड्रग्सच्या व्यसनाला कंटाळून पत्नी माहेरी गेली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी रुक्मिना बेगमचे  अमिमुलसोबत भांडण झाले होते. अमिमुलच्या अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतल्यामुळे त्याच्या पत्नीने भांडण केले होते. यानंतर ती अमिमुलला सोडून आपल्या अडीच वर्षाच्या मुलासह वडिलांच्या घरी गेली. तिथे ती अनेक महीने राहीली.

आधार कार्ड बनवण्याच्या नावाने मुलाला घेऊन गेला

पोलिसात दाखल तक्रारीनुसार, एक दिवस अमीमुल रुक्मिना बेगमच्या वडिलांच्या घरी पोहोचला. त्याने मुलाचे आधार कार्ड बनवायचे आहे सांगून मुलाला तेथून नेले होते. पण तीन -चार दिवस तो घरी परतला नाही. यानंतर, जेव्हा रुक्मिणाने चौकशी केली, तेव्हा कळले की अमीमुलने मुलाला पैशासाठी विकले आहे. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली.

40,000 रुपयात मुलाला विकले

पोलीस तपासात उघड झाले की, अमीमुलने मादक पदार्थांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मुलाला गोराईमारी येथे राहणार्‍या साजिदा बेगमला 40 हजार रुपयांना विकले. त्यानंतर पोलिसांनी मुलाची सुटका केली आणि त्याला आईच्या स्वाधीन केले.

Comments are closed.