Take a fresh look at your lifestyle.

उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. विठ्ठल मोरे यांची नूतन महाविद्यालयास भेट !

सेलू :- नांदेड येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ विठ्ठल मोरे यांनी शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी नूतन महाविद्यालय भेट दिली. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डॉ मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी महाविद्यालयाची परंपरा, मिळालेली पारितोषिके, ग्रंथालय, विविध उपक्रम यांची माहिती दिली. आपल्या मनोगतात डॉ विठ्ठल मोरे यांनी नूतन महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेचा गौरव करून महाविद्यालयाने नॅकच्या तीन सायकल पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे या महाविद्यालयाने पुढाकार घेऊन ज्या महाविद्यालयांचे अद्याप नॅक झालेले नाही त्यांना मार्गदर्शन करावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. महेंद्र शिंदे, उत्तम राठोड, समन्वयक प्रा. जामगे कार्यालय अधिक्षक कु. उषा कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रविण खरात यांनी केले तर डॉ राजाराम झोडगे यांनी आभार मानले.

डाॅ. विलास मोरे, सेलू

Comments are closed.