Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा बंदचा निर्णय मागे घ्या शिक्षण सम्राट डाॅ संजय रोडगे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

सेलू : कोराणाच्या दोन वर्षाच्या कालखंडात विद्यार्थ्यांचे झालेले मानसिक आणि शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी शाळा प्रयत्नशील असताना पुन्हा शाळा बंद करणे म्हणजेच विद्यार्थ्यांच्या जिवनाशी खेळ खेळल्यासारखा होत आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात घ्यावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा शिक्षण सम्राट डाॅ संजय रोडगे यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.

शाळा बंदचा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी सेलू उप विभागाचे उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोणाची लागण सुरु झाल्यापासून दोन्ही लाटांमध्ये शाळा बदं करण्याच्या पर्यायावर प्रशासन आधिक भर देत आहे. मात्र हेच विद्यार्थी आपल्या पालकांबरोबर ज्या-ज्या ठिकाणी फिरतात ती ठिकाणे मात्र सुरु ठेवतात. कोरोणाच्या तीस-या लाटेत सर्व सुरु ठेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे म्हणजे “दार उघडं आणि मोरीला बोळा” असाच म्हणावा लागेल. परभणी जिल्हयातील ग्रामिण व शहरी भागातील इयत्ता 1
ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू आहेत. केवळ परभणी जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सेलू तालुक्यात एकही बाधित रूग्ण नसताना शाळा बंद करून विनाकारण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा बंद करण्याचा निर्णय हा मागे घ्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर डाॅ संजय रोडगे, मिलिंद सावंत, महादेव साबळे यांच्यासह पालक व शिक्षकांच्या सह्या आहेत….

डाॅ विलास मोरे, सेलू

Comments are closed.