Take a fresh look at your lifestyle.

अफगाणिस्तान प्रश्नी डोनाल्ड ट्रंप आक्रमक, जो बायडन वर केली टीका, ऐकून धक्का बसेल

काबूल: तालिबान आणि अफगाण सरकार दरम्यान दोन महीने चाललेल्या गृहयुद्धानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानने युद्धसमाप्तीची घोषणा केली. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशात प्रचंड अनागोंदी माजली असून, लाखो लोक देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर येत आहेत.

जो बायडेन यांचा राजीनामा मागितला

अमेरिकेने 2 महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानमधून त्यांचे सैन्य माघारी घेतल्याने अफगाणिस्तानची ही स्थिती झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावर डोनाल्ड ट्रंप यांनी बायडेन सरकारला घेरले आहे. अफगाणिस्तान मधील संघर्षाला डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यान जबाबदार धरले आहे. त्यांनी यासाठी जो बायडेन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

जो बायडेन प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम

डोनाल्ड ट्रंप यांनी अफगाणिस्तानमधील स्थितीला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हार असल्याचे वक्तव्य केले. यासाठी जो बायडेन यांच्या प्रशासनाने घेतलेला चुकीचा निर्णय जबाबदार असल्याचे ते म्हणाले. डोनाल्ड ट्रंप यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेत राजकीय वाद सुरू झाला आहे.

शरिया कायदे लागू होणार

अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. तालिबानने देशात आता शरीया कानून लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. अफगाणिस्तानची कमान तालीबानी नेते मुल्ला बरदार सांभाळणार असल्याचे चित्र आहे.

Comments are closed.